पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अेक अुद्योग]               [१५


बुद्धीला सर्व विषय सारखेच ग्राह्य नसतात. तसेंच कोणाला अेका विषयांत गोडी वाटते, तर कोणाला दुसऱ्याच अेखाद्या विषयांत गोडी वाटते, याचेंहि कारण सांगतां येणें कठीण आहे. हें कारण कदाचित् मानसशास्त्रापेक्षा शारीरशास्त्रच अधिक सांगूं जाणे. इतकें मात्र माझें मला स्मरतें की आम्हा तिघां भावांपैकी दोघां वडील भावांनी भौतिक विज्ञान हा विषय बी. अे.ला घेतला होता, व त्यांपैकी अेकाने तर ( माधवराव) बी. अें.त दुसऱ्या वर्गात येअून युनिव्हर्सिटींतली स्कॉलरशिप व दक्षिणा-फेलोशिप मिळविली. अुलट मी भाषाविषय अैच्छिक घेतला.

 (१९) वाङमयाची आवड ही अितर कलांच्या आवडीप्रमाणें पुष्कळशी अुपजत असते. वाङ्मयलेखनाची आवड तरी मुद्दाम लावून घेअून कोणाला लागत नाही. वर्षेचीं वर्षें किंवा जन्मभर वाङ्मयाच्या वाचनांत घालवून ती लागतेच असेंहि नाही. याचें अेक अुदाहरण प्रो. जिनसीवाले हे होत. त्यांचा स्वतःचा पुस्तकसंग्रह फार मोठा होता. आणि त्यांतलीं बहुतेक पुस्तकें त्यांनी वाचलीं होतीं, असें त्यांतील खुणांवरून मीं स्वतः पाहिलें आहे. पण जिनसीवाल्यांचा म्हणून अमुक हा अेक लेख असें कोणासहि सांगतां येणार नाही. कारण त्यांनी साऱ्या जन्मांत कांही लिहिलेंच नाही. याच्या अुलट हल्ली हायस्कुलांतील मुलेंदेखील आपलीं हस्तलिखित मासिक पुस्तकें काढून त्यांत चांगले लेख लिहितात असें आढळतें.

 (२०) अुचित समर्पक शब्दयोजना करणें ही गोष्ट लहानपणापासूनच थोडीशी माझ्या अंगीं होती असें वाटतें. त्याविषयी अेक आठवण सांगतों. अिंग्रजी शाळेंत माझ्या वर्गात बंडु अप्पा तावरे म्हणून अेक जैन विद्यार्थी होता. त्याचें गणित चांगलें असे व माझें वाअीट असे. अेक दिवस मीं त्याला विचारलें की, "मास्तरांनी गणित घातलें की, लगेच तुला त्याची रीति बरोबर कशी रे सुचते ?" त्याने अत्तर दिलें, तुला भाषांतरांत किंवा निबंध-लेखनांत मास्तरांच्या पसंतीला पडतील असे शब्द लगेच सुचतात तशी. " त्याचें हें म्हणणें खरें होतें. कारण भाषांतर किंवा निबंध यांमध्ये मला हायस्कुलांत नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरचे मार्क