पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१६]

[माझा जन्मभरचा


मिळत. कवितेसंबंधानेहि तीच गोष्ट. आमचे गुरुजी वासुदेवशास्त्री खरे हे मुलांना स्वतः कविता करून दाखवीत व त्यांच्याकडून करवून घेत. अेक वेळ त्यांनी 'रामवनवास' या विषयावर संस्कृत श्लोक करावयास सांगितले. तेव्हा मी सात आठ श्लोक केले. त्या श्लोकांची त्यांनी प्रशंसा केली व म्हणाले, “ बी. अे.च्या वर्गांतील सामान्य विद्यार्थ्याला असे श्लोक करतां येणार नाहीत." त्यांतल्या कांही ओळी आठवतात त्या अशा --
  दुःखार्ता विजहुर्मृगादि पशवो ग्रासान् मुखस्थानपि
  मौनं कांचनपंजरस्थ विहगैः शोकाकुलैः स्वीकृतं
  वीणावादननर्तनादिसकलाः सौख्योपभोगा गताः
  रामे गच्छति काननं हि गहनं किं कस्य सौख्यं भवेत्
पण वाङ्मय सोडून व्याकरण विषयाकडे वळले असतां त्यांत मला विशेष गोडी वाटत नसे. मॅट्रिक्युलेशनच्या प्रिलिमिनरीमध्ये मी संस्कृत व अिंग्लिश भाषेच्या विभागामध्ये पास होअून बराच वर आलों, पण माझ्या व्याकरणाच्या अुत्तराच्या कागदावर परीक्षकाने ' जवळ जवळ शून्य' हीं अक्षरें बोटभर लांबरुंद लिहिलेलीं आढळलीं. याच वेळेस, हायस्कुलांत असतांनाच, मराठी कविता करावयास शिकण्याकरिता मी संस्कृत सुभाषितांचीं भाषांतरें करण्याचा अुपक्रम योजला होता. त्यांतील अेक आठवतें तें असें -

पीअूनि निरवशेषा कुसुमरसा
आपुल्या कुशलतेने
गुंजन भृंग करी तें अितरांचें
कार्य सफलतेतें ने ॥
( ही गुप्तदूत-विषयक अन्योक्ति आहे ).

 (२१) अभ्यासाचे विषय सोडून अवांतर वाचनाचा नाद मला कॉलेजांतच लागला. त्या नादामुळे क्वचित् परीक्षेला धोका येतो की काय असेंहि वाटे. पण सुदैवाने तसें झालें नाही. गणित सायन्स अशा नावडत्या विषयांतहि, पण अगदी जरुरीपुरते मार्क मिळवून, मी पास होत गेलों. बी. अे.च्या प्रिलिमिनरी परीक्षेनंतर अेक गोष्ट अशी घडली की, अेक ‘ चीप जॅक' बुकविक्या डेक्कन कॉलेजांत आला, व पांच रुपयांत स्कॉट्च्या