पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[१७


सगळ्या कादंबऱ्या ( बारीक टाअीपांतल्या) तीन व्हॉल्यूम्समध्यें बांधलेल्या जुनीं बुकें म्हणून त्यानें मला विकत दिल्या. तीं वाचण्यांत माझा अितका वेळ जाअूं लागला की, शेवटीं अभ्यासाचा अेक विषय जो बेकन तो कच्चा राहिला, व त्या पेपरमध्यें माझें कसें होअील ही भीति मला अखेरपर्यंत वाटे. अितकी की, माझ्या 'नाअिटमेअर'च्या म्हणजे दुःस्वप्नांच्या विषयांत ती अेक बाब अजूनहि केव्हा केव्हा येते ! आणि जागा झाल्यावर माझें मला हसूं येतें, व जीवाला सुख वाटतें की बेकन कच्चा राहिल्याने परीक्षा नापास होण्याची भीति आता तरी राहिली नाही !

 (२२) बी. अे. वर्गामध्ये असतां त्या वर्षाच्या मे महिन्याच्या सुट्टींत डेक्कन कॉलेजांत मी मुद्दाम राहिलों, घरी गेलों नाही. आणि कॉलेजच्या विषयांचा अभ्यास करतांना, त्याबरोबरच आपण कांही तरी मराठी लिहावें अशी अिच्छा मला प्रथमच झाली. तेव्हा मराठी भाषा लिहितां यावी म्हणून प्रयोगादाखल, माझें अेक आवडतें अिंग्रजी पुस्तक (मूळचें फ्रेंच) 'पॉल आणि व्हर्जीनिया' यांतील कांही वनश्रीवर्णनात्मक व कांही बालचरित्र भागांचें मराठी भाषांतर मी केलें असें आठवतें. अेल्अेल्.बी. च्या अभ्यासाला सुरुवात केली त्याबरोबर गद्यलेखन व कविता करणें या दोनहि गोष्टी मी सुरू केल्या. या वर्ष दोन वर्षांत मी केलेल्या कांही कविता हरिभाअू आपट्यांच्या 'करमणूक' पत्रांत तेव्हा छापल्या होत्या. तसेंच अर्धें भाषांतर व अर्धे स्वतंत्र अशी अेक सरमिसळ कादंबरी, स्कॉट्च्या 'रोकबी' नामक काव्यावरून. मी लिहिली होती, व हरिभाअू आपटे यांना दाखविली ती त्यांना आवडली. पण " करमणुकींत चालू कादंबरी अशी अेकच घेतों, व ती मीच लिहीत असतों, म्हणून मला तुमची ही अनेक भागांची कादंबरी घेतां येणार नाही " असें त्यांनी मला सांगितलें.

 (२३) या अेकदोन वर्षांतच मी वर्तमानपत्रांत पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली. त्या (१८९३) सालीं अेल्अेल्. बी.च्या टर्मसंबंधाने युनिव्हर्सिटीने कांही भानगड केली होती. त्यावर टीका करून मी अेक पत्र 'टाअिम्स ऑफ अिंडिया' मध्ये लिहिलें होतें. आणि कर्मधर्मसंयोगाने त्याच पत्राशेजारी डॉ. मॅकिकन यांचें दुसऱ्या अेका विषयावर पत्र छापण्यांत आलें
 मा. ज. अु. २