पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[१९


लिहिण्याचा नादी आहे असें पाहून त्यांनी तें पत्र जवळ जवळ माझ्या स्वाधीन केलें, व त्यांत मी कांही विनोदी व कांही टीकात्मक असे लेख लिहीं.

 (२५) मी बी. अे.च्या वर्गांतच वाङ्मय लिहिण्याला सुरुवात केली, पण कोल्हटकरांप्रमाणे स्वतंत्र निर्मिती करण्याची पात्रता माझ्या अंगीं तेव्हा मला वाटत नव्हती. तथापि श्रेष्ठ वाङ्मयाच्या गुणांची जाणीव मला होती. म्हणजे विचारसौंदर्य, अुचित समर्पक शब्दयोजना, ध्वनिमाधुर्य, वाक्यांतील तालबद्धता, अित्यादि गोष्टी मला तेव्हा स्वतः निर्माण करतां न आल्या तरी अिंग्रजी ग्रंथकारांत त्या आढळल्या तेथे तेथे त्यांनी माझ्या मनाची फ्कड घ्यावी असें होअी. आणि अुमेदीने मनाला असा प्रयोग करावासें वाटे की, अिंग्रजींत जर या गोष्टी साधतात तर त्या मराठींतहि कां साधूं नयेत ? भाषांतर म्हणजे अुसनवारी तर खरीच. पण केवळ भाषा बदलल्याने या गोष्टी सर्वस्वी नष्ट कां व्हाव्या ? वाचनाच्या अधिक व्यासंगाने व बुद्धीच्या परिणतीमुळे, जर आपणाला स्वतंत्र निबंध किंवा वर्णनें यांचे विषय सुचूं लागले व विचारसामग्री सिद्ध होअूं लागली तर वरील सर्व गुण प्रकट होण्यासारखें लेखन मराठी भाषेंतहि आपणाला कां न करता यावें ? निबंधांत विष्णुशास्त्री यांच्या निबंधांचें अुदाहरण डोळ्यांपुढे होतेंच. ललितवाङ्मयांत आपट्यांचें अुदाहरण होतें. त्यांची बरोबरी आपल्या हातून होणार नाहीच, व न होवो. परंतु त्या दिशेने प्रयत्न करता येण्याअितकी प्रतिभा व मराठी भाषा लिहिण्याची पात्रता आपणाजवळ कांही थोडी आहे, व अधिक मिळवितां येअील, असें मला वाटू लागलें. आणि अवांतर अुद्योग म्हणून जर कांही करावयाचा तर वाङमयव्यासंगच करावयाचा असें मी मनाच्या आवडीने ठरविलें.

 (२६) या व्यासंगांत मराठीअितकी अिंग्रजी लेखनाचीहि हौस मी मनांत नेहमीं बाळगिली होती. आणि वर्तमानपत्राच्या क्षेत्रांत पाअूल पडण्याला, खरोखर पाहतां, मराठीपेक्षा अिंग्रजी लेखनकलाच मला अधिक सद्यःफलदायी झाली. कारण मी टिळकांकडे आलों तो प्रथम अिंग्रजी 'मराठा' पत्राचाच संपादक होण्याच्या अपेक्षेने व आश्वासनाने. अिंग्रजी वाङमयांत