पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
२०]

[माझा जन्मभरचा


माझे आवडते ग्रंथकार मेकॉले, गोल्ड्स्मिथ, ऍडिसन, गिबन, व अिमरसन हे होते. त्यानंतर अितर अनेक अिंग्रजी ग्रंथकार माझ्या वाचण्यांत आले, पण ते वरील आवडत्या ग्रंथकारांची जागा कधीहि घेअूं शकले नाहीत. मी सुमारें वीस वर्षें 'मराठ्या'चा प्रत्यक्ष संपादक होतों. यामुळे त्यांत किंवा अितर प्रसंगीं, निबंध व भाषणे यांच्या रूपानें, मी अिंग्रजी लेख किती तरी लिहिले. आणि बारा वर्षांपूर्वीं त्यांतील निवडक अेक हजार पानें छापूनहि काढलीं आहेत. तथापि अिंग्रजी ही किती केलें तरी परभाषा ! तिच्यांत आमची मजल ' सरड्याची धाव कुंपणापर्यंत' या न्यायानेच जावयाची. मी प्रयत्न केला असता तर अिंग्रजींतहि अेखादा वाङमय ग्रंथ लिहूं शकलों असतों. तथापि प्रस्तुत समालोचनांत माझ्या वाङमयाची चिकित्सा करतांना अिंग्रजी भाषा वगळूनच मी लिहिणार आहें. कारण परकी भाषा हस्तगत होणें हें कठीण असतें. कोणाहि हिंदी लेखकाने आपण अिंग्रजी चांगलें लिहितों असें मानणें हें धाडसच होय. कारण नळराजाच्या टाचेवरील तिळमात्र जागेतून कलि नळाच्या शरीरांत शिरला, त्याप्रमाणें अुलट अेखाद्या शब्दप्रयोगांतून हिंदी लेखकाचें अिंग्रजी भाषेचें हास्यास्पद अज्ञान हटकून बाहेर पडावयाचें ! आम्ही हिंदी लोक अितकें तरी चांगलें अिंग्रजी लिहितों हीच गोष्ट मोठी समजावी. म्हणून मी स्वतःला चांगलें अिंग्रजी लिहिणारा असें समजत नाही. तथापि, वेळीं अवेळीं मला अद्देशून 'पुणेकरी' अिंग्रजी म्हणून थट्टा करणाऱ्या माझ्या मुंबअीकर निंदकांपेक्षा मी अधिक चांगलें अिंग्रजी लिहितों असें आत्मविश्वासाने म्हणतों.

 (२७) बी. अे. ची परीक्षा पास होऊन साता-यास आल्यावर माझ्या कविता-लेखनव्यवसायालाहि सुरुवात झाली. त्यांतील दोन पद्यें याखाली देतों. १८९२ त लिहिलेली हीच माझी पहिली मराठी कविता-

चंद्राला पाहून

 रजनिवल्लभा तुला नभःपथपथिका वंदन करी
 निबिडघनावृत अंबरमार्गा आक्रमिसी झडकरी ।
  अुदासवाणें तुझें हिमकरा पाहत मुख हें फिकें
  परि मम हृदयीं अतुल होतसे सौख्यचि जाणे निकें ||