पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[२१


 समचित्ताने गमे अुदारा मानव-लीला बरी
 पाहसि अपुल्या विमललोचनीं तवचि सुजनता खरी ॥
  अवनितलीं मातले पहा हे कलह तशा आपदा
  परि समतेने सकलां सुखवुनि देसि हिमकरीं मुदा ॥

     भिकारी
   पडली सांज पहा भूतळीं
   गगनीं नक्षत्रें अुगवलीं
    अंधकार करि धुंद दिशा
    जग शून्यवदनता आली ॥
   दिनभरि फिरलो चक्रापरी
   दया कोणिहि न मजवरि करी
    श्रांत चरण जाहले किती तरि
    हरहर शिणलों भारी
     सुजनसे आपणा पाहुनी
     आलों या द्वारीं ॥

 (२८) १८९३ सालीं सातारचे पुढारी दादासाहेब करंदीकर व बळवंतराव सहस्रबुद्धे, वकीलद्वय, हे राष्ट्रीय सभेहून परत आले तेव्हां त्यांच्या सत्कारसभेंत म्हणण्याकरिता मी केलेल्या कवितांपैकी आर्या--
  हिंदुस्थानवनाच्या कोनामधि राष्ट्रसदस तरु फुलला

  परि करंदिकर भ्रमरें आम्हां मकरंद येथ सेवविला ॥

  अितक्या सुदूर देशी राष्ट्रसभा जान्हवी प्रकट झाली

  तत्शैत्त्य पावनत्वें बलवंत समीरणें अम्हां दिधली ॥

 यांत त्या दोघां गृहस्थांचें विशिष्ट स्वभावगुणवर्णन अंतस्थ होतें तें लोकांना फार पटलें. सत्येंद्रनाथ टागोर साहेब, सेशन जज्ज सातारा, यांच्या मुलीला शिकविण्याकरिता मी अनेक मराठी पद्यें तयार केलीं होतीं. त्यांतलें सीतापरित्याग' हें अेक आजहि आठवतें--