पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
२४]

[माझा जन्मभरचा


त्यांना कळून येण्याचें कारण नव्हतें. पण १९०१ च्या जानेवारीच्या पहिल्या मंगळवारचा केसरींतील माझा अग्रलेख, मी हौसेने मुद्दाम परवानगी मागून घेअून लिहिला होता. तो टिळकांनी पाहिला, त्यांना आवडला, आणि अितरांनीहि त्या लेखाची त्यांच्याजवळ स्तुति केली. हा मराठी लेख पाहून व मराठ्यांतील माझ्या अेकंदर लेखांवरून, मला सर्वसाधारण भाषाविषयाची आवड आहे हें टिळकांना कळून आलें होतें. तथापि १९१४ साली मंडालेहून परत येअीपर्यंत माझे केसरींतील लेख त्यांच्या दृष्टीस पडण्यास मार्ग नव्हता. मात्र ते परत आल्यावर त्यांच्या मित्रांनी माझ्या लेखांची स्तुति खुद्द त्यांच्याजवळ केलेली त्यांनी अैकली होती. आणि १९१४ पासून १९२० पर्यंत तर त्यांच्या समक्ष व सहकारितेने मी केसरी लिहीत होतों. मराठी लेखनांतहि त्यांच्या अपेक्षेला मी शंभर टक्के अुतरत नसलों तरी ६०।७० टक्के तरी खास अुतरलों असेन.

 (३१) टिळकांना आपल्या राजकीय विषयावरच्या लेखांनीच 'केसरी' अितका लोकप्रिय करतां येत असे की, वाङमयाच्या अितर अंगांनी केसरी सजविण्याची आवश्यकता त्यांना कधीच भासली नाही. त्यांनी क्वचित् कविता वगैरेना केसरींत स्थल दिलें, तर राजकीय विषयावरील कवितांना. मग त्या कविता काव्य या दृष्टीने नीरस असल्या तरी त्यांना चालत. ते म्हणत ' देशभक्तीच्या कवितांमध्ये काव्य तें काय पाहावयाचें ? भक्ति असली म्हणजे झालें.' यामुळे हंगामी राष्ट्रीय अुत्सवांत म्हटल्या जाणान्या कवितांपैकी निवडक कविता केसरींत घालीत. याशिवाय केसरींत कविता कधी आल्या तर टिळकांच्या कांही आवडत्या मक्तेदार व्यक्तींच्या किंवा आग्रही भक्तांच्या ! अुदाहरणार्थ, पारखीशास्त्री यांच्या वार्षिक संक्रातीसंबंधाच्या, ठराविक अुष्टे संस्कृत संकेत घातलेल्या, किंवा किचकट श्लेषांनी मढविलेल्या अशा त्या असत. पण टिळकांचा स्वभाव जितका तुटक असा आपण समजतों तितका भिडस्तहि असे. त्यांच्या या तुटकपणाची सर्व झोड प्रतिपक्षीयांना सोसावी लागली. पण त्यांचे कांही ठराविक लोचट स्नेही त्यांच्या भिडस्तपणाचा सर्व फायदा लुटीत. अशा अेका स्नेहयाच्या आग्रहामुळे टिळकांनी सर्कसवाले काशिनाथपंत छत्रे यांना जाहीर मानपत्र दिलें. अितकेंच नव्हे, तर पद्यांकित अशा त्या मानपत्रांतल्या कांही कविता केसरींत छापल्या