पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[२५


पण याहीपेक्षा सांगण्यासारखी विशेष नवलाची गोष्ट ही की, त्या पद्यांतलें अेक पद्य स्वतः टिळकांनी रचलें! त्यांच्या सांगण्यावरून दुसरें अेक पद्य मी रचलें यांत विशेष कांही नाही. ता. २० मे सन १९०२ च्या केसरींत, टिळकांचा श्लोक व माझा श्लोक अेकत्र घातलेलें, तें अपूर्व पद्यमय मानपत्र छापलेलें आहे! वाचकांनी तेव्हा तें मानपत्र केसरींत वाचलें, पण त्यांतलें अेक पद्य स्वतः टिळकांनी रचलें ही गुप्त गोष्ट बहुधा कुणाला माहीत नव्हती. ते दोन श्लोक मी मुद्दाम गमतीखातर याखाली देतों :--

टिळकांचा श्र्लोक
( अश्वधाटी )

    लोकामध्ये फिरुनि जो का नर विलोका चमत्कृतिरसा ।
    ज्याशी स्वबंधुगुण राशी समर्पि रवि भाशीतरश्मि जसा ॥

    नाना कला निपुण माना समग्र अभिमानार्ह मेळवि तया ।
    नाथा असो सुखद पंथा प्रभो विनवि माथा पदी रचुनिया ॥

माझा श्लोक
( स्रग्धरा )

    झाला जीच्या सुयोगें प्रिय अरुण जरी व्यंग तो भास्करास ।
    केलें जीच्या प्रसादें परगृहिं नकुलें आपुल्या निन्हवास ||
    अैशी ही अश्वविद्या प्रचुर गुणवती जी नला कार्यवाही ।
    येथे द्वीपांतरीं हो सुखफलद तुम्हां आमुची प्रार्थना ही ॥

 बुद्धिमंत टिळक मनावर घेतील तर काय वाटेल तें करतील, हा जो लोकांचा समज व विश्वास होता तो किती यथार्थ होता, हें या श्लोकासारख्या अगदी क्षुल्लक गोष्टीवरूनहि कळून येण्यासारखें आहे. मात्र टिळकांची काव्यपठडी जुनी. ती या शब्दचित्र श्लोकांतहि दिसून आली आहे. पण सरकस म्हटली म्हणजे त्यांत घोड्यांचा नाच असावयाचाच. म्हणून 'अश्वघाटी' हें वृत्त त्यांनी आपल्या श्लोकाला पसंत केलें, यावरून त्यांचा मार्मिकपणा दिसून आला. आणि खरोखर त्या वृत्ताची रचना अशी