पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
२६]

[माझा जन्मभरचा


आहे की, तो नीट वाचला तर घोडा ठुमकत पाअूंडावर टापा टाकीत नृत्य करतो आहे की काय, असें श्रोत्याला वाटावें. पण वृत्ताचें हें औचित्य साधून शिवाय ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांत 'काशीनाथा' हा शब्द चार ओळींत दोन तीनदा साधला आहे !

 (३२) पण टिळकांच्या लेखांतली ओजस्विता ज्याला आपल्या लेखांत आणतां येत नव्हती अशा माझ्यासारख्या केसरीच्या संपादकाला, केसरींत ललितवाङ्मयाचीं कांही अंगें नटवावी असे वाटणें स्वाभाविक होतें. आणि त्या दिशेने मी काही प्रयत्नहि केले. मात्र हीं अंगें कितीहि नटविलीं, तरी केसरीचा सर्वसाधारण गंभीर स्वभाव मी लोपूं दिला नाही. टिळकांपेक्षा मी विनोदाचा अुपयोग केसरींत अधिक करीत होतों, तरी त्याला थिल्लरपणाचें रूप न येअील अशी खबरदारीहि घेत होतोंं. किंबहुना टिळकांनी, भिडस्त स्वभावामुळे, काव्याच्या दृष्टीने हीनगुण अशा कविता केव्हा केव्हा केसरींत घालूं दिल्या तशा मी सहसा घातल्या नाहीत. मी ललिताची लीला केसरींत दिसूं दिली असेल तेव्हा फार तर असें घडलें असेल की, " केसरी हा रागाने शेपटी हापटणारा, डरकाळ्या फोडणारा सिंह न दिसतां, त्या जागीं, अेखाद्या वेळीं, आपल्या अंगाला बिलगून खेळणाऱ्या-बागडणाऱ्या, आपल्या छाव्यांच्या अंगावरून शेपटीचा झुबका चवरीसारखा वारणारा, नुसता गुरगुरणारा, असा सिंह दिसला असेल."

 (३३) १९१० सालीं मी केसरीचा संपादक झालों. लगेच १९१२ सालांत मनोरंजक व बोधप्रद अशीं कांही सदरें घालण्यास मी सुरुवात केली. त्यांतील पहिलें म्हटलें म्हणजे तीस वर्षांपूर्वींच्या (१८८२ सालच्या ) केसरींतील अुतारे. केसरीला या सालीं ३१ वें वर्ष लागलें होतें. आणि अवघ्या तीस वर्षांनीहि पिढी बदलून बोधप्रद तुलना करतां येण्यासारखीं स्थित्यंतरें व मतांतरें होअूं शकतात. हें सोदाहरण दर्शविण्याचा माझा हेतु होता. या दृष्टीने लेखनपद्धति, सामाजिक मतें, राजकीय सिद्धान्त, वगैरे दर्शविणारे तीस वर्षांपूर्वीचे अुतारे वाचकांना मनोरंजक वाटले. पण या अुता-यांतूनच पुढे अेक गंडांतर निघालें. तें असे. कै. प्रो. गोपाळराव आगरकर यांच्या लेखांतील अेका अुताऱ्याचें निमित्त करून, जातिद्वेष