पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[२७


अुत्पन्न करण्याचा केसरीवर आरोप ठेवून, नव्या प्रेस ॲक्टान्वयें, मुंबई सरकाराने केसरीकडून पांच हजारांचा जामीन मागितला ! यामुळे हें सदर बंद करण्यांत आलें. तेव्हा राजकीय परिस्थिति अितकी नाजूक झाली होती, आणि केसरी बुडविण्याचे सरकारचे प्रयत्न अितके कसून सुरू होते की, कोणत्याहि दिशेला पाअूल टाकणें तें अगदी जपून टाकलें पाहिजे अशी दहशत माझ्या मनांत क्षणोक्षणीं अुभी असे. तथापि त्यांतूनच कसा तरी मार्ग काढून, पण अेकंदरीने राष्ट्रीय राजकारणाचें धोरण वाचकांच्या डोळयांपुढून हलूं नये अशी योजना मी करीत असें.

 (३४) दुसरें नवें सदर म्हटलें म्हणजे नाटकें व नाट्य-प्रयोग अित्यादि ललित अंगांच्या समालोचनाचें. केसरींतील अेक लेखक कै.सदाशिव हरि भावे हे नाट्यविषयाचे मोठे भोक्ते असत. त्यांनी हा नवीन अुपक्रम करण्याची परवानगी मला मागितली व ती मी त्यांना दिली. त्यामुळे अुलट सुलट वादहि सुरू झाले. तथापि रंगभूमीवर अवतरणा-या वाङ्मयासंबंधी व कलेसंबंधी चौकसबुद्धि वाचकांत अुत्पन्न होअूं लागली. हें सदर कित्येक सोवळ्या अभिरुचीच्या वाचकांना आवडलें नाही. पण केसरीशीं निकट संबंध असलेले असे आम्ही दोघे जुनेनवे संपादक, म्हणजे खाडिलकर व मी, हे स्वतःच नाटककार व नाट्यप्रिय असल्यामुळे, मी आपल्या अभिरुचीचा आग्रह विशेष धरला आणि केसरींतील विषयमर्यादा अशा रीतीने वाढविली यांत आश्चर्य नाही.

 केसरींत कविता, लघुनिबंध, लघुकथा, वक्रोक्ति लेख, तरंग-तुषार, खडे बोल, अित्यादि ललितप्रकार मी घातलेच. पण शेवटीं १९३४ सालीं मनाचा धडा करून अगदी खरीखुरी कादंबरीच, नवलपूरचा संस्थानिक ही, घालून या स्वैरपणाचा अुच्चांक गाठला. हें पाहून सनातनी वृत्तीचे परंपरेचे भोक्ते असणारे कांही वाचक नाराजहि झाले. पण या सर्व ढंगांच्या मुळांतले विषय व भावना राजकीय होत्या म्हणूनच निभावलें. या ललित अंगाचीं अुदाहरणेंच देतों म्हणजे वाचकांना कदाचित् आठवण होअील.

 कवितेचें सदर सुरू करावयाचें, तर अुगीच केव्हा तरी अेखादी कविता घातल्याने तें अंग ठरीव होत नाही. म्हणून ओळीने अेक-दोन