पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
५६]

[माझा जन्मभरचा


 "याला कारण तात्यासाहेब यांची औचित्याकडे असणारी मार्मिक दृष्टि, विषयाचें मर्म, व त्यांतील नेमका महत्त्वाचा भाग विश्लेषण करून काढण्याची भेदक बुद्धि, त्यांना स्वाभाविक सुचणाऱ्या मार्मिक विनोदी अुपमा, अेकान्तिक अगर अेकांडेपणाचा अभाव व व्यापक सहानुतीची मनोभूमिका त्यांचें नित्य नवें चालू असलेलें वाचन, त्यायोगें त्यांना प्राप्त झालेला अष्टपैलूपणा, अित्यादि गुणांचा समुच्चय हेंच होय. तात्यासाहेब हे अुपजत वक्ते नसतांना, किंबहुना वक्तृत्वाला हानिकारक अशा कित्येक स्वाभाविक अडचणी असतांनाहि, त्यांच्या वरील गुणांची सरशी होते.
 " जे गुण अध्यक्षाला अुपयोगी पडतात, तेच वाङ्मयांत प्रस्तावना लेखकाला असावे लागतात. तात्यासाहेब यांनी प्रस्तावना लिहिली, म्हणजे अेक प्रकारें वाङमयक्षेत्रांत त्या ग्रंथाला " राजमान्यता" प्राप्त होते. या दृष्टीने त्यांना मराठी वाङमयाच्या राजाची अुपमा शोभेल. आणि राजाच्या शिक्कामोर्तबाला जी किंमत आहे, तीच त्यांच्या अभिप्रायाला अगर प्रस्तावनेला मराठी वाङ्मयांत प्राप्त झाली आहे. ( 'वैनतेय' पत्रांत ग. वि. केतकर. )
 टिळक-केळकर यांची भाषासरणीहि अशीच मनोवेधक आहे. समर्पक दृष्टान्तांनी विषयप्रतिपादन सुलभ करणारे केळकर हे अेकटेच मराठी लेखक होत. मार्मिक कोट्या, सूक्ष्म विनोद, बहारदार वर्णनें, सूचक सुभाषितें व म्हणी, ठसकेबाज व नेमके शब्दप्रयोग, तर्कशुद्ध व पटणारें विषयप्रतिपादन, आणि पुनः समतोलपणाच्या तारेवरील कसरत, ह्रीं सर्व अेका वेळी व अेका ठिकाणीं पाहावयाचीं असल्यास केळकर यांचा अेखादा सुंदरसा अग्रलेख वाचावा म्हणजे झालें ! टीकेचाहि तोच प्रकार. चिपळूणकर काय, टिळक काय, आगरकर काय, किंवा परांजपे काय, या सर्वांचाच प्रतिपक्षावर 'ब्रह्मास्त्र' सोडण्याचा प्रघात, पण केळकर यांचा नेहमीचा प्रघात म्हणजे शत्रूवर टीकेचें 'मोहनास्त्र' सोडण्याचा ! यामुळे होतें काय की, प्रतिपक्षाला परांजपे यांची 'व्याजोक्ति', किंवा टिळक-आगरकरांची 'अेक घाव की दोन तुकडे' करण्याची पद्धति पुरवते; पण केळकर यांचे हे ' रेशमी चिमटे' आणि 'शालजोडींतले' कांही सोसवत नाहीत ! याचींहि अुदाहरणें 'केळकरकृत लेखसंग्रहां'त पुष्कळ सापडतील.