पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[५७


 “केळकर यांचा आणखी महत्त्वाचा विशेष म्हणजे हा की, जरनॅलिझम् ही अेक कला आहे, विद्या आहे, ही गोष्ट त्यांना जितकी पटली, व ती साध्य करून घेण्यांत त्यांना जितकें यश मिळालें, तितकें त्यांच्यापूर्वी कोणालाहि मिळालें नाही. चिपळूणकर यांची जरनॅलिझमची कल्पना ग्रंथरचनेहून फारशी भिन्न नव्हती. टिळक-आगरकर यांनी जरनॅलिझमकडे कलेच्या दृष्टीने पाहिलें नाही. आणि परांजपे यांना जरी जरनॅलिझम् ही अेक कला आहे हें कळलें असलें, तरी त्यांना ती केव्हाही साध्य झाली नाही. मतप्रसार सर्वांनीच केला. पण चिपळूणकर यांचें विशेष लक्ष ग्रंथरचनेवर व भाषाभिवृद्धीवर असे, आणि टिळक-आगरकर यांचें विशेष लक्ष मतप्रसारावर असे. मतप्रसार करीत असतां, स्वतःला न कळत त्यांच्याकडून कौशल्य दाखविलें गेलें, व अशा रीतीने त्यांनी महाराष्ट्राचा जरनॅलिझम् निर्माण केला हें खरें. पण या धंद्यांत पडण्याच्या वेळीं आपण अुत्तम वृत्तपत्रकार होणार या महत्त्वाकांक्षेने ते प्रवृत्त झाले असें म्हणतां येत नाही. आगरकरांची अशी अिच्छा होती असें वाटतें; पण टिळक तर हिंदुस्थानाच्या सुदैवामुळेच या धंद्यांत गोवले गेले. अेरवी त्यांची महत्त्वाकांक्षा शिक्षणशास्त्रज्ञ व संशोधक होण्याची होती. साधारण सर्व प्रसिद्ध ' सौ. वत्सलावहिनींनी आपल्या अेका 'पत्रां'त म्हटल्याप्रमाणें केळकर यांनी केसरीची परंपरा कायम राखली, अितकेंच नव्हे, तर तिच्यांत सुंदर व अलंकारिक भाषासरणीची भरहि घातली. ' सौ. वत्सलावहिनी ' केळकरांना असें सर्टिफिकेट देतात, यापेक्षा केळकर यांच्या संपादकीय कौशल्याचा आणखी कोणता पुरावा पाहिजे ? विषय कसाहि असो, केळकर यांचें प्रतिपादन नेहमी गोडच असावयाचें !" ('वैनतेय' पत्रांत येरवडेकर, अेम्. अेम्. अेल्अेल्. बी. )
 (४६) वाङमयोपासनेच्या पंचेचाळीस वर्षांच्या अवधींत अनेक ग्रंथकारांचे ग्रंथ वाचल्याने, माझ्या भाषापद्धतीवर त्यांचा कळत न कळत थोडाबहुत परिणाम झाला असला तरी, मी पूर्वीच्या जुन्या कोणाहि लेखकाला सोळा आणे आदर्शभूत मानला नाही, किंवा त्याला गुरु करून त्याचा शिष्य म्हणवून घेतलें नाहीं. केसरीसंबंधाने टिळकांची लेखनपद्धति माझ्या डोळ्यांसमोर पंचवीस-तीस वर्षे असतां, त्यांच्या माझ्या