पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अंक अद्योग]

[८९


मंडळयांच्या मार्गाने जाअून अल्पायुषी ठरली; व अमात्यमाधव हें नाटक शेवटचें असल्यामुळे त्याचे प्रयोगहि तिच्या हातून फारसे झाले नाहीत. पहिल्या तीन नाटकांपैकी चंद्रगुप्त नाटक हें कांही विशेष कारणामुळे मला स्वतःला अधिक आवडत असलें तरी, त्यांत विनोदाचा भाग बराच कमी असल्यामुळे चित्ताकर्षक नाटकमंडळी त्याचे प्रयोग थोडे कमी करी. मात्र " तोतयाचें बंड ' आणि 'कृष्णार्जुनयुद्ध' यांच्यावर त्यांचा भर असून तीं त्यांच्या हातून फार चांगली वठत.
 (७६) माझीं हीं पहिलीं चार नाटकें १९१२ ते १९९५ या तीन वर्षांत लिहून झालीं आणि चित्ताकर्षक नाटक मंडळी मोडल्यामुळें नवीन नाटकें लिहिण्याचें माझें काम कांही काळ थांबलें. पण १९९८ सालीं फिरून दोन नाटकें लिहिण्याचा प्रसंग आला. तीं 'वीरविडंबन' व 'संतभानुदास' हीं होत. नाटक न लिहिलें तरी नाटकाला अुपयोगी पडण्यासारखीं कथानकें माझ्या डोक्यांत घोळत असतात. त्यामुळे बलवंत नाटक मंडळीने नाटक लिहून मागतांच विराटपर्वांतील अुत्तर गोग्रहणाचा प्रसंग मी नाटक लिहिण्यास घेतला. तो घेण्याचें त्यांतल्या त्यांत अेक विशेष कारण नुकतेंच झालेलें (१९१४-१८) महायुद्ध हें होतें. कीचकवधानंतर लवकरच घडलेला हा प्रसंग असें कल्पून या नाटकाला सुरुवात केलेली आहे. महायुद्ध चाललेलें असतां वीरवृत्तीच्या हिंदी शिपायांना जुलमाने परदेशांत युद्धावर पाठविण्यांत आलें. वाटेल तशी रिक्रूटभरती केली. पण पुष्कळ खरे वीर अज्ञातवासांत राहिले. त्यांना पराक्रम करता आला नाही. ज्यांनी पराक्रम केले त्यांनाहि त्यांचें यश अुघडपणें मिळालें नाही. भलत्याच्या पराक्रमावर भलत्याची कीर्ति व्हावी अशाहि गोष्टी पुष्कळ घडल्या. अिकडे युद्ध चाललेलें असतां चैनबाजी व रंगेलपणा अिग्रज लोकांचा कमी झाला नव्हता. अित्यादि अनेक गोष्टींचे ध्वनि मनांत सारखे अुमटत असतां हें नाटक लिहिलें गेलें आहे. आणि त्याचे प्रयोग होत असतां, प्रथम कांहीं दिवस, महायुद्धाच्या या आठवणी सामान्य माणसाच्याहि मनांत असल्यामुळें, प्रयोग चालला असतां कांहीं खटकेदार वाक्यांवर नेमकी टाळी पडे.</बर> (७७) 'वीरविडंबन' नाटकांत अुत्तराचें पात्र मूळ भारतांत आहे त्याप्रमाणेंच मी रंगविलें आहे. मात्र गायनशाळेंतील प्रसंग अतिशयोक्तिपूर्ण