पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/108

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऋजू पण कठोर प्राचार्य : डॉ. हिंदुराव पाटील

 आजच्या प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांची नि माझी पहिली ओळख झाली तेव्हा ते प्रा. एच. बी. पाटील या नावाने सर्वपरिचित होते. हा काळ सर्वसाधारण २००४ चा असावा. तेव्हा मी शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाचा मानद संचालक म्हणून कार्यरत होतो. माझे कार्यालय मराठी विभागाशेजारी होते. प्रा. एच. बी. पाटील यांची पीएच. डी.ची तोंडी परीक्षा झाली, त्या दिवशी त्यांचा माझा पहिला परिचय झाल्याचे आठवते. त्यांचे संशोधक, मार्गदर्शक, परीक्षक, मराठी विभागातील अन्य सहकारी प्राध्यापक सर्व मिळून तोंडी परीक्षेनंतरच्या स्नेहभोजनास निघाले होते. माझ्या कार्यालयातून मी बाहेर पडताना ही सर्व मंडळी दत्त. ती सर्व परिचित होती, अनोळखी होते, ते प्रा. एच. बी. पाटील, उभ्या-उभ्या गप्पा झाल्या. मी प्रा. एच. बी. पाटील यांचे औपचारिक अभिनंदन केले; पण ते त्यांनी अत्यंत स्वाभाविक ऋजुतेने स्वीकारले, हे त्यांच्या देहबोलीवरून जाणवलेले. ऋजू, मितभाषी, स्नेही गृहस्थ अशी त्यांची पहिली प्रतिमा माझ्या मनावर त्या वेळी कोरली गेल्याचे आठवते.

 माझे स्मरण बरोबर असेल तर नंतर मला ते भेटले प्राचार्यपदाचे उमेदवार म्हणून. मी निवड समितीचा सदस्य होतो. त्यांच्या मराठी भाषा, साहित्यप्रभावाने मी माझ्या मताचा पासंग त्यांच्या ताजव्यात टाकल्याचे आठवते. मी निमित्त होतो इतकेच; कारण संस्थेचे ते पसंत उमेदवार होतेच. विवेकानंद शिक्षण

माझे सांगाती/१0७