पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२६६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यामुळे त्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे खटला दाखल करून दाद मागावी लागेल.
 दूध भावासंबंधी आजूबाजूच्या राज्यांतील परिस्थितीचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येईल.
 २४ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या किसान समन्वय समितीच्या बैठकीत नवीन येऊ घातलेल्या समस्यांवर विचारविनिमय करून देशपातळीवरील आंदोलन जाहीर करण्यात येईल. त्या आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी स्त्रीपुरुष मोठ्या संख्येने भाग घेतील.

(१९ ऑक्टोबर २००७ - विस्तारित कार्यकारिणी, मिरज.)
(शेतकरी संघटक ६ नोव्हेंबर २००७)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६६