पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शस्त्रक्रिया करून त्याला पुढच्या काळात पीळ बसणार नाही यांची व्यवस्था करतात. तातडीनं डॉक्टरांनी उपचार न केल्यास वृषणाच्या पिळामुळे वृषणाचा रक्तप्रवाह बंद होऊन ते वृषण सडू शकतं आणि मग शस्त्रक्रिया करून ते काढून टाकावं लागतं. अंडवृद्धी (हायड्रोसील) पुरुषांचे वृषण वृषणकोषात असतात. वृषण व वृषणकोषाच्या मध्ये एक स्राव असतो. तो नाव सातत्यानं तयार होत असतो व तो शोषूनही घेतला जातो. जर हा स्राव शोषून घेण्याच्या यंत्रणेत काही कारणांनी अडथळा निर्माण झाला, तर हा स्राव वृषण व वृषणकोषामध्ये वाढायला लागतो. या स्रावामुळे वृषण फुगतात (पण दुखत नाहीत). याला 'अंडवृद्धी' म्हणतात. शस्त्रक्रिया करून हा स्राव साठणार नाही याची व्यवस्था करता येते. वेरिकोसिल आपण पाहिलं असेल, की काही व्यक्तींच्या पोटऱ्यांवर सुजलेल्या निळ्या रक्तवाहिन्या दिसतात. याचं कारण असं, की या अशुद्ध रक्त नेणाऱ्या वाहिन्यात ज्या झडपा असतात त्यांच्यात दोष निर्माण झालेला असतो. त्या झडपा नीट काम करत नाहीत म्हणून रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही व या वाहिन्या सुजलेल्या दिसतात. याला 'वेरिकोज वेन्स' म्हणतात. काही पुरुषांच्यात असाच प्रकार वृषणांमध्ये दिसतो. वृषणातून अशुद्ध रक्त नेणाऱ्या वाहिन्यांच्या झडपात दोष निर्माण झाला तर वाहिन्या रक्तानं फुगतात. याला 'वेरिकोसिल' म्हणतात. काही वेळा 'वेरिकोसील'मुळे वृषण दुखू शकतं. 'वेरिकोसील' असलेल्या पुरुषांच्या पुरुषबीज निर्मितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या समस्येवर डॉक्टर शस्त्रक्रिया करायचा सल्ला देतात. हर्निया प्रत्येक अवयवाची आपली ठरलेली जागा असते. जेव्हा एखादा अवयव आपली ठराविक जागा सोडून दुसऱ्या जागेत सरकतो त्याला आपण 'हर्निया' म्हणतो. हर्नियाचे बरेच प्रकार आहेत. उदा. 'अंबिलीकल हर्निया' नवजात बालकाचं छोटं आतडं बेंबीतून बाहरे येणं इ. ९४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख