पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एन्डोमेट्रिऑसिस मासिक पाळी संपली की स्त्रीच्या गर्भाशयात एक विशिष्ट पेशींचा थर वाढायला लागतो. मासिक पाळीच्या वेळी या विशिष्ट पेशींचा थर गळायला लागतो व योनीवाटे या पेशी व रक्त बाहेर येतं. पण काही वेळा या पेशी स्त्रीबीजवाहिन्यांतून शरीरात जाऊन विविध अवयवांना चिकटतात. उदा. स्त्रीबीजांड, स्त्रीबीजवाहिन्या, आतडं इत्यादी. याला एन्डोमेट्रिओसिस म्हणतात. एन्डोमेट्रिऑसिसमुळे स्त्रीला ओटीपोटात, पाठीत खूप दुखतं. हा त्रास, मासिक पाळीच्या वेळी जाणवणारा त्रास व काही एसटीआयमुळे दिसणारी लक्षणं सारखी असल्यामुळे अचूक निदान करण्यास कौशल्य लागतं. काही स्त्रियांना एन्डोमेट्रिओसिसमुळे वंध्यत्व येतं. फिस्ट्युला काही वेळा इन्फेक्शनमुळे किंवा शस्त्रक्रिया करताना एखादया अवयावाला भोक पडतं व ते भोक दुसऱ्या अवयवात उघडतं. त्यामुळे एका अवयवापासून दुसऱ्या अवयवाला जोडणारी एक नळी तयार होते. याला 'फिस्ट्युला' म्हणतात. उदा. योनी ते मूत्रमार्गाला जोडणारी नळी तयार होणं किंवा योनी व गुदमार्ग याला जोडणारी नळी तयार होणं. लघवी व संडास करावी लागत असल्यामुळे ही नळी बंद होण्यास खूप कालावधी लागू शकतो. शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा लागू गूशकतो. गर्भाशयातल्या गाठी (फायब्रॉईड्स/पॉलिप्स) काही वेळा गर्भाशयात गाठी होतात. त्यांच्यामुळे पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणं, ओटीपोटात दुखणं असे परिणाम दिसतात. शस्त्रक्रिया करून या गाठी काढता येतात. काही वेळा डॉक्टर संपूर्ण गर्भाशय काढायचा सल्ला देतात. सीस्ट्स सीस्ट्स म्हणजे पाण्यासारख्या नावाने भरलेले फोड. असे फोड शरीराच्या विविध अवयवांवर येऊ शकतात. उदा. ते गर्भाशयात, योनीत, स्त्रीबीजांडावर, बारथोलिन ग्रंथीत असू शकतात. बहुतेक वेळा हे फोड निरुपद्रवी असतात. पण जर असा फोड फार वाढला तर शस्त्रक्रिया करून तो काढावा लागतो. फिशर काही वेळेला गुदद्वाराला भेगा पडतात. या भेगांमध्ये संडासाचे कण जाऊन त्यात इन्फेक्शन होतं. याला फिशर म्हणतात. औषधं घेऊन व गुदद्वाराला औषध मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख