पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असते. असा ताण असताना आपल्या मतिमंद मुलाला मायेने वाढवणं कौतुकास्पद आहे. 'प्रयत्न' संस्थेच्या राधिया गोहील म्हणाल्या, "आम्ही तीन भावंडं-एक बहीण व एक भाऊ. माझी बहीण मतिमंद आहे. माझ्या आईवडिलांनी आमच्या तिघांना वाढवण्यात कधीही वेगळेपण दाखवलं नाही. तिघांनाही समान माया दिली. त्यामुळे आमच्या बहिणीला सांभाळणं हे नाईलाज म्हणून आम्ही कधी केलं नाही व आजही तसं करत नाही. आम्हा तिघांना सांभाळताना माझ्या पालकांनी कधीही भेदभाव केला नाही व त्यांच्या नात्यात याच्यामुळे कधीही ताण निर्माण झाला नाही.' मतिमंद मुलांना शिकवण्यासाठी वेगळ्या शाळा लागतात. अशा शाळांमध्ये स्वच्छतेपासून सर्व गोष्टी त्यांना शिकवायचा प्रयत्न होतो. संडास झाल्यावर शी धुणं असू देत किंवा साबणाने हातं धुंगं असू देत या गोष्टी बाहुल्यांच्या मॉडेल्सचा वापर करून दाखवल्या जातात व काही वेळा प्रत्यक्षात त्यांना ती कृती शिकवण्यास मदत केली जाते. प्रयत्न असतो की मुला/मुलींना काही मूलभूत गोष्टी स्वत:च्या स्वतः करायला आल्या पाहिजेत. अर्थातच वेळ लागतो. अनेक वेळा आईवडिलांनी आपलं मूलं मतिमंद आहे म्हणून त्यांनी कसंही वागलं तरी चालतं असं समजून कोणतीच शिकवण दयायचा प्रयत्न केलेला नसतो. आपापल्या कुवतीनुसार काहीजण शिकतात, तर काहीजण शिकू शकत नाहीत. मुलं/मुली वयात आल्या की साहजिकच पालक मुलांच्या लैंगिक पैलूंबाबत खूप अस्वस्थ होतात. सेवासदन दिलासा'च्या माजी प्राध्यापिका संध्या देवरूखकर म्हणाल्या, “वयात आलं की या मुलांचा लैंगिक पैलू जागा होतो. या मुला/मुलींचे चेहरे अत्यंत बोलके असतात. टीव्हीवर प्रणय दृश्यं दिसली की मुलं खूप एक्साईट होतात. त्यांचं अनुकरण करून ते एकमेकांना आलिंगन देणं, चुंबन देणं अशा गोष्र्टी करायचा प्रयत्न करतात. तारुण्यात मतिमंद मुलांमध्ये वीर्यपतन होऊ लागतं. मतिमंद मुली तारुण्यात आल्या की मासिक पाळी सुरू होते. हे बदल होताना खासगीत कोणत्या गोष्टी करायच्या व सार्वजनिक ठिकाणी कोणत्या गोष्टी करायच्या हे या मुला/मुलींना उमगत नाही. घरच्यांना या मुला/मुलींना कसं समजवायचं हे कळत नाही.' मुलाच्या लिंगाला ताठरपणा आला आहे हे घरच्यांना, पाहुण्यांना दिसलं तर घरच्यांना व पाहुण्यांना खूप लाज वाटते. काही मुलं सगळ्यांसमोर हस्तमैथुन करतात. हे उघडपणे होताना बघून काहीजणांचा गैरसमज होतो की मतिमंद मुलांना इतरांपेक्षा खूप जास्त प्रमाणात लैंगिक इच्छा असतात. वास्तवतः खूप मतिमंद असलेल्या मुलांना लैंगिक इच्छा समजण्याची प्रगल्भता नसते. ज्यांना काही " ११६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख