पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गर्भधारणा होईल.' किंवा 'वीर्य तोंडाला क्रीमसारखं लाव. तुझा चेहरा उजळून निघेल.' आपल्याला सांगितलेल्या कोणत्या गोष्टी खऱ्या मानायच्या व कोणत्या खोट्या मानायच्या हे कळत नाही.

 अंध मुलांना आकार व रूप दिसत नसल्यामुळे त्यांना मुलगा व मुलगी यांतील शारीरिक फरक समजवायला वेळ लागतो. यामुळे वयात आल्यावर त्यांना लैंगिक शिक्षण देताना खूप अडचण येते. अंधांना लैंगिक शिक्षण शिकवताना येणाऱ्या मर्यादा मी स्वतः अनुभवल्या आहेत. काही वर्षांपूर्वी मला एका अंध शाळेमध्ये मुलांना लैंगिक शिक्षण शिकवायला बोलावलं होतं. तोपर्यंत मी कधीही अंध मुलांना लैंगिक शिक्षण दिलं नसल्यामुळे मी तयारी करायचा प्रयत्न केला. अगोदर शाळेत जाऊन मुलांची ओळख करून घेतली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. इतर ठिकाणी मी लैंगिक शिक्षण चित्रांवर भर देऊन शिकवतो. इथे चित्रांची साधनं वापरून चालणार नव्हतं. शरीररचेनची मॉडेल्स् शाळेतही नव्हती आणि माझ्यापाशीही नव्हती. फळ्यावर काढलेली चित्र बहुतेकांना कळणार नव्हती (काहींना थोडीशी दृष्टी होती. ते फळ्याच्या अगदी जवळ येऊन ज्या 'अँगल'नी दिसतं त्या 'अँगल'नी मान वळवून ती चित्रं न्याहाळू शकणार होती).

 कार्यशाळेच्या दिवशी त्यांना थोडासा 'फील' यावा म्हणून मी आईकडून कणकेचे गोळे करून घेतले व कणकेची जननेंद्रियं बनवून डब्यातून शाळेत नेली. या मुलांना त्या कणकेच्या 'मॉडेल्स'ना स्पर्श करायला सांगितला. मला माहीत होतं की कणकेची 'मॉडेल्स' वापरणं हा चांगला पर्याय नाही पण इलाज नव्हता.

  अशा विविध अडचणींमुळे अंध मुलांना लैंगिक ज्ञान मिळण्यास अडचणी येतात. सुरक्षित संभोगाचं महत्त्व अनेकांना माहित नसतं. एक अंध व्यक्ती म्हणाली, "लग्नाच्या आधी माझे अनेक स्त्रियांबरोबर संबंध झाले. पण कधीही निरोध वापरला नाही. निरोध वापरायची माहितीच नव्हती, कोणीच सांगितलं नाही, कोणी शिकवलं नाही. एकदा एकीला माझ्यापासून दिवस गेले. मग तिला गर्भपात करावा लागला."

 अंधांमध्ये अजून एक अडचण येते ती म्हणजे, सार्वजनिक व खाजगी यांतला फरक ओळखण्याची. दिसत नाही म्हणून कोणती गोष्ट कुठे करायची आणि कुठे करायची नाही हे सहज कळत नाही. एक अंध म्हणाले, “माझे शाळेतले पहिले अनुभव फक्त समलिंगी संभोगाचे होते. खूप आवडायचे. एक-दोनदा मी त्याच्यासाठी शिक्षाही भोगली आहे. शिपायांनी आम्हांला एक-दोनदा नग्न अवस्थेत बघितलं होतं. आम्ही सेक्स कुठे करायचा व कोण बघतंय हे कसं कळणार? नंतर शाळेतून बाहेर पडल्यावर पहिल्यांदा स्त्रीबरोबर सेक्स झाला.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

११९