पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पण बहुतांशी वेळा तो पूर्णपणे दुर्लक्षित केला गेलेला दिसतो. लहान मुला/मुलींचं लैंगिक शोषण, कॉलेजमधील मुला/मुलींचं रॅगिंग, स्त्रियांचा लैंगिक छळ, स्त्रियांवर/समलिंगी पुरुषांवर झालेली लैंगिक जबरदस्ती हे सर्व प्रकार सर्रास घडतात. फार थोडी उदाहरणं आपल्यासमोर येतात. बहुतेक वेळा, बळी पडलेली व्यक्ती, आपली अब्रू जाईल, लोक आपल्यालाच नावं ठेवतील या भीतीनं न्याय मागत नाहीत. अशा शोषणाचे परिणाम अनेकांना आयुष्यभर भोगावे लागतात. 9 लहान मुला/मुलींचं लैंगिक शोषण कार्यशाळेत लैंगिक शोषणाबद्दल आमचा संवाद चालला होता. एका ताईंनी हात वर केला, म्हणाल्या, “मला खरं तर हे वर्णन करून सांगायलाही जीभ अडखळत होती. कसं सांगायचं ना? पण शेवटी हिय्या केला. मी माझ्या शेजारच्या बाईंना सांगितलं, की 'तुमची मुलगी पलीकडच्या काकांच्या घरी जाते. एकटी किती तरी वेळ तिथे असते. तुम्ही जरा लक्ष ठेवा. मी एकदा त्या काकांना तिला मांडीवर घेऊन तिच्या चड्डीत हात घातलेला पाहिला.' हे सांगितलं तर त्या मुलीच्या आईचा विश्वासच बसला नाही. तिनं त्यांची बाजू घेतली व म्हणाली, छे!छे! ते असं कधीच करणार नाहीत.' मी त्या बाईला उगीच सांगितलं असं वाटायला लागलं. पण काही दिवसांनी त्या बाईनी तेच पाहिलं आणि मग तिचा विश्वास बसला. आपल्या देशात लहान मुलां/मुलींचं लैंगिक शोषण प्रचंड प्रमाणात होतं पण खेदाची गोष्ट आपण हे मान्य करण्यास तयार होत नाही. एकतर आपल्याला लैंगिक विषयाची लाज वाटते व दुसरी गोष्ट अनेक वेळा लैंगिक शोषण करणारी व्यक्ती माहितीचीच असते, आपल्या विश्वासातील असते. ते असं करणारच नाहीत' असा आपला विश्वास असतो. बरं, जर आपण या शक्यतेच्या सामोरे गेलो तर " . मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १२५