पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुन्हेगाराचं फावत असलं तरी, एक वेळ तो परवडला पण ही समाजाची हिडीस नजर नको असं अनेकांना वाटतं. मी जेव्हा पुरुषांना विचारतो, की "तुमच्यावर जबरदस्तीनं काही पुरुषांनी गुदमैथुन केला तर तुम्ही पोलिसात जाल का?" सगळा वर्ग एकदम शांत होतो. कोणाच्या तोंडून ब्र निघत नाही. पुरुषांवर लैंगिक जबरदस्ती होऊ शकते ही कल्पना पुरुषांना अत्यंत भयावह असते (ते गांभीर्य त्यांना स्त्रीवर झालेल्या बलात्कारात दिसत नाही). स्त्री असो वा पुरुष असो, जबरदस्तीनं झालेल्या संभोगाचा खूप मोठा मानसिक धक्का बसतो, नैराश्य येतं, मनात हिंसक विचार येतात, मन विषण्णं होतं. आपण काय वाईट केलं म्हणून आपल्यावर ही वेळ आली? याचा काय अर्थ लावायचा? माणूसपणावर कसा विश्वास ठेवायचा? असे अनेक प्रश्न पडतात. या धक्क्यातून सावरायला बराच काळ लागतो. जोडीदाराबरोबर लैंगिक नातं प्रस्थापित करताना बलात्काराच्या प्रसंगाची आठवण होऊन जोडीदाराला प्रतिसाद दयायला अडचण होते. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला जबरदस्तीच्या संभोगाला तोंड द्यावं लागलं. त्यांचे विचार त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे - "ही घटना माझ्याबरोबर होईपर्यंत असा एक पारंपरिक दृष्टिकोन होता, की बलात्कार फक्त स्त्रियांवरच होतात आणि अशा घटना फक्त वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवरच्या बातम्यांपर्यंत मर्यादित असतात. अशी घटना आपल्या बाबतीत कधीच होणार नाही. पण हे सगळं खोटे ठरलं, किंवा हे सगळं खोटं ठरवण्यासाठीच माझ्या आयुष्यात ती घटना घडली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत विचारांचा एक अखंड प्रवास चालू आहे. कधी मला तो प्रवास अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडतो, तर कधी सगळी उत्तरं आणि सत्य गवसल्याचा भास निर्माण करतो. काही मुद्दे, प्रश्न हे एक समलिंगी पुरुष म्हणून पडणारे आहेत, तर काही एक माणूस म्हणून पडणारे आहेत. हा प्रकार झाल्या झाल्या माझ्या बॉयफ्रेंडला हे कळलं होतं. पण त्यानंतर त्यानं तातडीनं मला भेटण्याची तसदीही घेतली नाही. स्वत:चा मोबाईल बंद करून माझा मित्र दुसऱ्या दिवशी घटनेनंतर साधारणत: १८/२० तासांनी भेटायला आला. 'माझा अपघात झाला असता तर असाच १८ तासांनी भेटायला आला असतास का?' या माझ्या प्रश्नाचं उत्तर त्याला कधीच देता आलं नाही. म्हणाला, 'जर आता परत धमकीचे फोन किंवा ई-मेल आले तर मी नोकरी सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक होईन.' 'माझं काय?' हा प्रश्न फक्त मलाच भेडसावत होता. त्याला या सगळ्यांत कुठेच अडकायचं नव्हतं. पोलिसांकडे जाण्याचा सल्ला मात्र देत होता. पण तिथे हा किती उपस्थित राहील, याबद्दल शंका घेण्याचं कारण, की माझा मित्र त्यानंतर १३८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख