पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गर्भधारणा झाली. हे शक्य आहे का? हो. जर नसबंदीची शस्त्रक्रिया व्यवस्थित केली गेली नाही तर हे होऊ शकतं. काही वेळा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही शस्त्रक्रिया व्यवस्थित होत नाही. उदा. एका केसमध्ये एका डॉक्टरांनी स्त्रीच्या नसबंदीच्या वेळी एकाच स्त्रीबीजवाहिनीवर शस्त्रक्रिया केली. जर पुरुष नसबंदी व्यवस्थित न केल्यामुळे कालांतराने त्याची बायको गर्भार झाली तर ती परपुरुषापासून गर्भार झाली असा तिच्यावर आरोप होतो. याच्यातून तिला छळ, अवहेलना, अपमान सहन करावा लागतो. नसबंदी व कायदा

  • लग्न झाल्यावर, जोडीदाराला माहिती न देता व त्याची/तिची संमती न घेता

नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणं हा जोडीदाराचा मानसिक छळ मानला जातो.

  • आणिबाणीच्या काळात जबरदस्तीनं कुटुंब नियोजन करण्याचे प्रकार घडले.

याच्यामुळे कुटुंब नियोजन हा अत्यंत महत्वाचा विषय अडगळीत पडला. जनसंख्या आटोक्यात यावी असं अनेकांना वाटतं व कुटुंब नियोजनाचा अवलंब व्हावा म्हणून काही राज्यं विविध नियम बनवू लागली आहेत. उदा. हरियाणा राज्याने दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना पंचायतीत काही पदं भूषवता येणार नाहीत असा नियम काढला. या नियमाविरुद्ध एकाने कोर्टात याचिका दाखल केली. याच्यावर निकाल देताना कोर्टाने, पदावरच्यांनी संततीनियमन पाळून आदर्श व्यक्ती बनणं गरजेचं आहे हे सांगून याचिका बरखास्त केली. सक्तीच्या संततीनियमनानं उद्देश साध्य होतो का? याचा विचार व्हावा. जिथे कुटुंब नियोजनाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, या साधनांचं ज्ञान नाही, जिथे अनेकांनी निरोध हा शब्द ऐकलेला नाही, कुटुंब नियोजन हा फक्त स्त्रीचाच प्रश्न मानला जातो, जिथे मुलगा होत नाही तोवर मुलं होऊ दयायची ही धारणा आहे तिथे नुसते असे नियम बनवून काय साध्य होणार आहे? आजच्या हाताबाहेर गेलेल्या लोकसंख्येचं प्रमाण बघता कुटुंब नियोजन हा राष्ट्रासमोरचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे यात कोणतीही शंका नाही. त्याचं महत्त्व पुरुषांना पटवून देणं, कुटुंब नियाजनाची साधनं सर्वत्र मोफत किंवा स्वस्तात उपलब्ध करणं, ती कशी वापरायची याची पुरुषांना व स्त्रियांना शिकवण देणं हे सामाजिक संस्थांसमोरचं मोठं आव्हान आहे.

२१० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख