पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • काहींमध्ये पुरुषबीजांच्या आकारात वेगळेपण असतं.
  • काहींच्या पुरुषबीजवाहिनीत अटकाव असल्यामुळे पुरुषबीजं वृषणातून

पूरस्थ ग्रंथीपर्यंत पोहोचत नाहीत. अपवादात्मक केसेसमध्ये पुरुषबीजं (व वीर्य) लिंगातून बाहेर न येता मूत्राशयात जातात (स्ट्रोग्रेड इजॅक्युलेशन).

स्त्री

  • स्त्रीच्या काही विशिष्ट संप्रेरकांची योग्य वेळी व योग्य प्रमाणात निर्मिती

झाली नाही, तर स्त्रीबीज परिपक्व होत नाही. (उदा. 'पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम' मध्ये अंडोजेन्सची निर्मिती जास्त होते, स्त्रीबीज परिपक्व होण्यास अडचण येते, पाळी अनियमित होते, चेहऱ्यावर, पोटावर केस येतात.)

  • क्वचित वेळा स्त्रीबीजांड लवकर (उदा. पंचवीस-तीस वयाच्या आसपास)

काम करेनाशी होतात. म्हणजेच लवकर रजोनिवृत्ती येते. (प्री-मॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर)

  • स्त्रीबीजवाहिनीत अटकाव असेल तर पुरुषबीजं स्त्रीबीजापर्यंत पोहोचत

नाहीत. हा अटकाव जन्मतः असू शकतो किंवा कालांतराने काही आजारांतून निर्माण होऊ शकतो. उदा. जननेंद्रियांचा क्षयरोग (जनायटल टीबी), परमा इत्यादी. उपाय पुरुष व स्त्री या दोघांच्या विविध चाचण्यांतून निघणाऱ्या निष्कर्षातून पुढची चाचणी किंवा उपायांबद्दल डॉक्टर मार्गदर्शन करतात. अंदाजे २० टक्के जोडप्यांना चाचण्या करूनही वंध्यत्वाचं कारण कळत नाही. चाचण्यांचे निष्कर्ष, स्त्रीचं वय, इतर आजार, आर्थिक परिस्थिती, मानसिक तयारी या सगळ्यांचा विचार करून अजून काही काळ वाट बघणं, औषधं, शस्त्रक्रिया, संभोगेतर गर्भधारणेचे मार्ग अशा विविध पर्यायांवर चर्चा केली जाते. चाचणीच्या रिपोर्टमध्ये एका जोडीदारामध्ये कारण सापडलं की त्याला/तिला नैराश्य येतं. 'आपल्याच वाट्याला हे का आलं?' म्हणून चिडचिड होते. त्याचबरोबर माझ्यामुळे माझ्या जोडीदाराला मूल मिळत नाही म्हणून अपराधीपणाची भावना मनात निर्माण होते. जोडीदाराला, आपल्याला असा जोडीदार का मिळाला याचा राग येऊ शकतो. डॉ. सनत पिंपळखरे म्हणाले, "मी नेहमी जोडप्यांना सांगतो की तो आणि ती असे दोन भाग म्हणून विचार करू नका. तुम्ही मिळून हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. एक युनिट म्हणून विचार मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २१३