पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उतराव्या लागतात. याचबरोबर 'सरोगेट' मातेचं तंत्रज्ञान स्त्रियांचं शारीरिक व आर्थिक शोषण करण्यासाठी वापरलं जाईल का? ही एक रास्त भीती आहे. दत्तक मूल काहींना कधीच पालकत्व प्राप्त होत नाही. काहींना प्राथमिक तपासणीतच कळतं की त्यांना मूल होणार नाही, तर काहींना खूप प्रयत्न करून या वास्तवाला सामोरं जावं लागतं. काहीजणांना अशा वेळी नातं तोडायची इच्छा होते. हे नातं ठेवून काय फायदा? माझ्यात जर काही कमी नाही तर मी जोडीदारामुळे या नात्यात का अडकून राहायचं? अशी भावना काहींच्या मनात येते. अशा परिस्थितीत जोडीदार एकमेकांना समजून घेणार का? किती दिवस समजून घेणार? काय पर्याय शोधणार? हे सगळं एकमेकांच्या प्रेमावर, समजूतदारपणावर अवलंबून असतं. मूल हवं असेल तर दत्तक मूल घेणं हा पर्याय असतो. कोणाला मूल दत्तक घेता येतं? याची माहिती (चाईल्ड अॅडॉप्शन रेग्युलेशन अथॉरिटी-CARA) मार्गदर्शिकेत दिली आहे.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २१७