पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जीवनशैली काही हिजडे शर्ट-पँटवर राहतात (खड्यावर राहणं) व काही साडीवर राहतात (साटल्यावर राहणं). काहीजणांच्या घरी आपल्या मुलानी हिजड्यात रित घेतली आहे हे माहीत नसतं. समाजाच्या दबावापोटी काही हिजडे स्त्रीबरोबर लग्न करतात, काहींना मुलंबाळं असतात. काहीजणांनी संसार करून मूलबाळ झालं की मग हिजड्यात रित घेतलेली असते. हिजडा समाजात जवळपास सर्वजण ट्रान्सजेंडर असल्यामुळे यातील काहीजण लिंग व वृषण काढायची शस्त्रक्रिया करून घेतात. पूर्वी हे खच्चीकरण हिजडेच करायचे. हे करताना जिवाला धोका असायाचा. आता बहुतेकजण डॉक्टरांकडे जाऊन ही शस्त्रक्रिया करतात. लिंग व वृषण काढून टाकलेल्या हिजड्यांना 'निर्वाण' हिजडे म्हणतात. निर्वाण हिजड्याला लिंगाच्या जागी लघवी करण्यासाठी एक छिद्र असतं. काहीजण लिंग व वृषण काढून योनी तयार करून घेतात. (बघा, सत्र- 'लिंगभाव'). ज्या हिजड्यांनी आपलं वृषण व लिंग ठेवलं आहे अशांना आखवा' हिजडे म्हणतात. 'आखवा' हिजड्यांपेक्षा 'निर्वाण' हिजडे जास्त श्रेष्ठ समजले जातात. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काही हिजडे फक्त 'मंगती' करतात. काहीजण फक्त 'ढोलक बघाईला जातात (मूल जन्माला आलं की बारशाच्या वेळी कार्यक्रमात नाचणं, बाळाला आशीर्वाद देणं). काहीजण 'बिडे-बयाने' करतात (काही मुस्लिम लोक लग्न ठरलं की हिजड्यांना नाचायला बोलवतात. हिजडे नाचतात, होणाऱ्या नवरदेवाला आशीर्वाद देतात.) काहीजण चोऱ्यामाऱ्या करतात. काहीजण वेश्याव्यवसाय करतात. मुख्य सामाजिक प्रवाहापासून हा समाज पूर्णपणे वेगळा पडल्यामुळे त्यांना लैंगिक आरोग्याबद्दल फारशी माहिती नसते. असुरक्षित संभोगाचे धोके माहीत नसल्यामुळे काहीजण एचआयव्हीसंसर्गित होतात. हल्ली काही पुरुष, ट्रान्सजेंडर्स नसूनसुद्धा पैसे कमवण्यासाठी म्हणून साडी घालून आपण हिजडे आहोत असं ढोंग करून 'मंगती' करताना दिसतात. यांना 'बहुरूपी' म्हणतात. हे जर हिजड्यांच्या हाती लागले तर यांना बेदम चोप खावा लागतो, कारण यांच्या मंगतीनं हिजड्यांच्या पोटावर पाय येतो. हिजडा बनण्यास जबरदस्ती होते का? "लहान बाळाच्या जननेंद्रियांमध्ये खूप वेगळेपण असलं, तो मुलगा आहे की मुलगी आहे हे समजण्यास अवघड असेल, तर हिजडे अशा मुलाला जबरदस्तीनं घेऊन जातात हे खरं आहे का?" व "मुलांना पळवून त्यांचं जबरदस्तीनं खच्चीकरण केलं जातं हे खरंय का?" असे प्रश्न मला अनेक वेळा विचारले जातात. माझ्या अनेक वर्षांच्या पुण्यातल्या कामात मला असं एकही उदाहरण दिसलं नाही (क्वचित मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २३७