पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

शक्ति नष्ट होऊन गंधज्ञान बरोबर कळत नाहीं; आणि असें झालें ह्मणजे घाणेरडी हवा फुफ्फुसांत जाऊन प्रकृति बिघडते. ह्मणून अशा बाबतींत खबरदारी घेतली पाहिजे. मुलें नाकांत गुंजा, बिया चगैरे वस्तु घालतात. यामुळे त्या तेथें फुगून त्रास होतो, यासाठींहि फार काळजी घेतली पाहिजे. नाक नेहमीं स्वच्छ ठेवावें. नाकपुड्या शेंबडानें भरूं देणे किंवा त्यांत मल सांचू देणें बरें नाहीं.

रसनेंद्रिय.

 जिभेला रसनेंद्रिय असें ह्मणतात. जिभेंत स्वाद किंवा रुचि जाण- ण्याची शक्ति असते, ह्मणून एकादा पदार्थ आपण तोंडांत घातला तर त्याची चव कशी आहे, हे आपल्याला समजतें. चव जाणण्याची शक्ति ज्या ज्ञानतंतूंनीं उत्पन्न होते ते ज्ञानतंतू फार गरम पदार्थ खाण्यानें, चहासारखीं कढतकदृत किंवा बर्फासारखी थंडगार पेयें पिण्याने अथवा पानतंबाखु खाण्यानें कमजोर होऊन त्यांची स्वाद जाणण्याची शक्ति कमी होते, ह्मणून असे पदार्थ सेवन करण्याची सवय लावून घेणें कधींहि बरें नाहीं.

१०–स्वच्छता.

 स्वच्छता किंवा शुचिर्भुतपणा हे आरोग्याचें एक मोठे साधन आहे. स्वच्छतेपासून स्वतःला व पहाणारालाहि एक प्रकारचा आनंद होतो. अस्वच्छता किंवा मलीनपणा हें रोगाचें माहेरघर होय. कारण रोग- जंतूंनां मल किंवा घाण फार प्रिय असते. ह्मणून आरोग्याची इच्छा करणारांनी प्रत्येक बाबतींत, उदाहरणार्थ, शरीर, अन्नपाणी, घर व त्याच्या आजुबाजूची जागा, कपडेलत्ते वगैरे स्वच्छता राखणे अत्यंत जरुरीचें आहे. यांपैकी पहिल्या ह्मणजे शरीराच्या स्वच्छतेसंबंधाचें विवे- चन मागें तोंडधुणे व स्नान या प्रकरणांत केले असून दुसऱ्या व तिसऱ्या
-