पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

ळींतील हवेमुळे शरीरांतील उष्णता बाहेर जात नाहीं. लोंकर घामाचें शोषण करिते व त्या घामाची वाफ झाल्यावर तिला पुनः द्रवरूप देते. यामुळे शरीरांतील उष्णता कमी होऊं शकत नाहीं व सर्दीहि होत नाहीं. ह्मणून थंड व उष्ण दोन्ही देशांत तिचे कपडे आंत घालण्याला उपयोगी आहेत. लोंकरीचे कपडे धुण्यानें आणि त्यांतहि हलका साबू किंवा सोडा लाऊन धुतल्यानें अधिकच संकोचित होतात. कपड्यांनां घाम व मळ लागत असल्यानें ते धुणें जरूरीचें आहे; पण लोंकरीचे कपडे सोड्यानें तर मुळींच धुवूं नयेत. कारण त्यापासून लोंकरीत असलेले तेल किंवा चरबी नाहींशी होऊन कपडे बिघडून जातात. ह्मणून असे कपडे धुण्यासाठी एक प्रकारचा साबू (ज्यांत केरोसीन व पॅराफीन असतें ) मिळत असतो, तो लाऊन धुणे बरें. अगर कोमट पाण्यांत थोडें केरोसीन तेल मिळवून त्यानें धुतल्याने सर्व मळ निघून जातो.

 रेशगाचे कपडे, लोंकरीप्रमाणें उष्णतावाहक नसल्यानें आंत घाल- ण्याला चांगले आहेत; पण घामाचें शोषण करण्याचा धर्म त्यांत नाहीं. शिवाय कापूस, लोंकर वगैरेप्रमाणे ते टिकाऊ नसून किंमतीनें तर फारच महाग असतात.

 चामड्याचे कपडे थंड देशामध्ये फार उपयोगी पडतात. आपण त्यांचा बूट, जोडे, पायतण वगैरेपलीकडे उपयोग करीत नाहीं.

 वरील विवेचनावरून बहुतेकांच्या लक्ष्यांत आलेच असेल, कीं, लोंक- रीचे कपडे नंबर एकचे असून बाकी त्याच्या खालोखाल आहेत. आप- ल्याकडे लोक लोंकर, सूत व ताग यांचाच विशेष उपयोग करितात. पुष्कळ लोक लोंकरीचे कपडे उष्ण ह्मणून घालण्यास घाबरतात; पण ती त्यांची चुकी आहे. लोंकर आंगांतील उष्णता बाहेर जाऊं देत नाहीं, त्यामुळे आपण तिला उष्ण समजतों. पण बाहेरील उष्णता ज्या वेळीं