पान:मी भरून पावले आहे.pdf/212

हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रॉब्लेम असायचे ना. त्या सोडलेल्या होत्या असं नाही. पण नवरा नोकरी करत नाही, तरी चांगला आहे. मारहाण करणारा नाही. पिणारा, खाणारा नाही. नवऱ्याची परमिशन असल्याशिवाय बाई बाहेर निघत नाही. त्यांचे नवरे मला ओळखणारे होते. मी पण त्यांच्यामध्ये जायची नं. त्यांना समजून सांगायची. 'चलो, उसको भेजो, महमूदभाई उनको भेजो', असं म्हणून सगळ्यांना बाहेर काढत असे. त्यामुळे “आई आपा, तुम जाओ” असा रिस्पेक्ट देणारे पुरुष पण तिथं होते. गरीबच, शिकलेले नाहीत, त्यांना मदत व्हावी म्हणूनच बायकांना काही सांगायचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे त्यांना असं वाटायचं नाही की मी गैर शिकवते म्हणून. तर तिथं धर्माचं आम्ही सांगतच नव्हतो. तर तू तुझ्या स्वतःच्या पायावर कशी उभी राहशील? तुझ्या घरातल्या मुलांना जेवण कसं दिलं पाहिजे. तुझ्या नवऱ्याला तू कसं सांभाळशील, हेच मी सांगत असे. मी नंतर नंतर तर असंही म्हणाले की दर महिन्याला एक विषय ठेवायचा घरगुती. मी येते नि तुम्हांला सांगते. तुम्ही नवऱ्याबरोबर, मुलांबरोबर कसं रहायचं? घरातलं काम तुम्हांला झेपत नाही. कशा रीतीने करायचं? अमुक रीतीने करा. भांडी चारदा घासता, धुणं दोनदा. सगळा वेळ त्याच्यात घालवता. तर असं सगळं. आम्ही एवढं सुद्धा शिकवलं.
 साने गुरुजींची सांताक्रूझची शाळा आहे लीलाधर हेगडेंची. एकदा मी त्यांच्याकडे गेले. म्हटलं, तुम्ही मला मदत करा. माझ्या काही बायका मी इथे ट्रेनिंगला पाठवते तीन-चार. आणि ट्रेनिंग झाल्यावर त्या बायकांनी घरगुती बायकांना शिकवावं असं आपण ठरवू या. तर त्यांनी सांगितलं कन्सेशन देतो. सहा महिन्यांची चार बायकांची फी भरली जायची तिथे. कपडा बिपडा सगळं. सुई, दोरा, कात्री मी दिली त्यांना. तुमच्या दारात बस आहे. तिथं दारात थांबते. आठ दिवससुद्धा त्या बायका गेल्या नाहीत. त्यांच्यातल्याच तरुण मुली शोधल्या. शिकलेली बाई नसली तर शिवणकाम करू शकत नाही. ती मोजमापं कशी घेणार? तर त्या म्हणाल्या, 'नही आपा गर्दी बहुत लगती है, धक्के बहुत लगते है, नही आपा ऐसा लगता है, पैसा लगता है.' गेल्याच नाही त्या बायका. ऐदीपणा असतो ना. काम न करता खाण्याचा. वातावरण असेल तशी मुलं तयार होतात. त्यांना शिकवणार कोण? आपल्या घरात सकाळी काठी घेऊन पहिल्यांदा सांगणार, शाळेत जा. तर आपल्याला शाळेची सवय लागते. त्यांना तशी काही जाणीवच नाही. 'उसको दिमागच नही है. वो सीखनेमे हुशार नही, उनका दिमागच नही

मी भरून पावले आहे : १९७