पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/120

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पद्धतीचे आंगरखे, विलायती फॅशनचे आंखूड कोट आणि विजारी याही प्रचारांत यावयाच्या असल्याने प्रस्तुत प्रतिनिधीजवळ असलेले उत्तम कपडेही रद्द ठरले. मोजे, बूट, गळबंद इत्यादिकांसंबंधीही विशिष्ट पद्धत ठरली असल्याने अल्पावधींतच सर्व खरेदी आटोपावी लागली.

 साडेदहा वाजतांची वेळ निमंत्रणपत्रिकेंत दिली असली तरी साधारणपणे दोन तास आधी जाणें श्रेयस्कर असा सल्ला मला एका इराणी सद्गृहस्थाने दिला होता, आदले दिवशीं पाऊस सारखा पडत असल्याने रस्त्यांत चिखल मनस्वी झाला होता. कदाचित् गतवर्षाची साठलेली घाण धुऊन काढण्यासाठीच ही इराणची साफसफाई चालली असावी असें मानण्यापलीकडे दुसरें कारण सांगतां येईना. नव्या वर्षाचा आरंभ मात्र अगदी निरभ्र आकाशांत प्रकाशणाऱ्या सूर्यकिरणांनी सर्वत्र सुवर्णछटा पसरून केला. त्याच्या स्वागतानिमित्त तोफांची सरबत्ती झाली. नियोजित अवधीपेक्षा दोन तास आधी जाऊनही तेथील अलोट जनसंमर्दाकडे पाहून निराशा होते की काय अशी भीति वाटली. प्रवेशद्वारीं गुलाली रंगाचे तंग पोषाक केलेले 'वेत्रधर' होते. आंतील विस्तृत चौकांत सेना-समुदाय जमला होता. त्यांचा वेष इतका नयनमनोहर होता की, इंद्रधनुष्यांतील सर्व रंग एकत्र आणून त्यांचा उपयोग केला आहे असे वाटे. शिस्तवार रांगांनी सशस्त्र सैनिक उभे राहून आपल्या नायकांच्या आज्ञेकडे तीक्ष्ण कान देऊन उभे होते. कोणाचा वेष अस्मानी रंगाचा तर कोणाचा लाल भडक रंगाचा. कांहींचा पोषाक पिवळा तर कित्येकांचा हिरवा, नुसत्या रंगाने गणवेष [युनिफॉर्म] इतके खुलून दिसले नसते, पण योग्यतेच्या मानाने कोणाच्या, बेषावर सुवर्णतंतूंची वेलबुट्टी काढलेली होती आणि कित्येकांच्या पोषाकावर उंची रेशमी धाग्यांची निरनिराळ्या

११४