पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/189

हे पान प्रमाणित केलेले आहे.

'सेत्रीप रमचंदा तिगर'


 पण त्याचा परिणाम फार मोठा झाला. तेहरान सोडून जातांना पोलिसांनी 'जासूस' (गुप्त हेर) म्हणून पांच तास मला अडकवून ठेवलें! एका गावांतून दुसऱ्या गावीं जावयाचें झाल्यास पोलिसांची लेखी परवानगी घ्यावी लागते, असा इराणी कायदा आहे. पोलिसांकडे जाऊन ती अनुज्ञा आणण्याचे काम ब्रिटिश वकिलातींतील अधिकाऱ्यांकडे सोपविलें होतें. त्याप्रमाणे त्यांनी परवानगी आणून दिली. त्यांत काय लिहिले होते हें अर्थातच मला कळणें शक्य नव्हतें. तेहरानच्या वेशीवर पोलिसानें पासपोर्ट व हा परवाना पाहिला. आणि तो लगेच मोटार थांबवून टेलिफोनकडे धांवला. ‘सेत्रीप रमचंदा तिगर' या नांवाचा इसम खोटें नांव धारण करून मशहदला चालला आहे. हिंदुस्थानांतून तो 'मुदीर-इ-रुझनामे' (वर्तमानपत्राचा बातमीदार) म्हणून आला असें आपल्या रिपोर्टांत आहे. पण परवान्यांत त्याचे नांव 'माँसिया तिककार' असें लिहिलें असून 'सिफारात-इ-इंग्लिसी' मध्ये काम करणारा असें म्हटलें आहे. त्याला मी आता नांव विचारलें तर तो कांही तिसरेंच सांगतो. 'षोक' (धंदा) 'मुदीर' असल्याचें तो कबूल करतो. तेव्हा काय करावयाचें?
 हा प्रकार काय आहे हे मला आता कळलें. आपलें नांव इतकें कठीण ठेविल्यामुळे ही अडचण उद्भवली. बड्या पोलिस अधिकाऱ्याकडे जातांच तो हसून म्हणाला, "सेत्रीप रमचंदा तिगर–? वाः, काय गोड नांव आहे? आणि तुम्हांला अडकवून ठेवणारा कोण? तुमचा पासपोर्ट इंग्रजी काँसलकडून आला होता ना? जा. काही हरकत नाही."

 त्या अधिकाऱ्याला माझ्या नांवांत गोड काय वाटलें त्याचा तपास करतां असे कळलें की, 'सेत्रीप' म्हणजे मोठी अधिकाराची, हुद्द्याची

१८३