पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/190

हे पान प्रमाणित केलेले आहे.
मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

व बहुमानाची जागा आहे. प्रांतीय गव्हर्नरासारखाच सेत्रीपचा हुद्दा. तेव्हा मी 'जासूस' कसा असेन?
 यानंतर मी माझें नांव 'सेत्रीप रमचंदा तिगर' हें नीट लिहून घेतलें व कोठेंही पोलिसांनी विचारलें की, वही काढून तें सांगत असें. इराणांत पुनः जावयाचें झाल्यास नांव बदलून जावें असें मी नक्की ठरविलें आहे.

  *
*
  • *

 मुसलमान यात्रेकरूंसमवेत प्रवास करावा लागला. तेव्हा दिवसांतून तीन चार वेळां निमाज पढण्यासाठी मोटार थांबवावी लागे. माझ्याखेरीज इतर सर्व उतारू निमाज पढत आणि मी मुळीच पढत नसें. तें पाहून एका चौकस तुर्काने चौकशी केली की, "तुमचा खुदा कोणता???" "वल्ला, अल्ला" असें आकाशाकडे पाहून उत्तर देतांच तो गप्प बसला. 'वल्ला' याचा अर्थ 'अल्ला शपथ.' अल्लाची शपथ घेणारा खोटें बोलेल कसा? ही त्याची समजूत.

 मोटारमधून प्रवास करतांना कंटाळा येई. तेव्हा बरोबरीच्या उतारूंना 'एकवार सवाल बुलंद कून' असें म्हणायचा अवकाश की, 'अल्ला रसुलिल्ला'चा गजर सुरू होई. 'पुंडलीक वरदा हरि विठ्ठल' किंवा अशाच प्रकारचीं भजनी वचनें म्हणतात तसाच त्यांचा अल्लामय गिल्ला सुरू होई. केव्हा केव्हा कुराणांतील 'श्लोक'ही ते म्हणून दाखवीत. वरचेवर त्यांना सुचविण्याचें काम मी आपण होऊनच मजकडे घेत असें. तेव्हा त्यांनीही मला एकदा 'जबान-इ-हिंदुस्तानी' मध्यें (हिंदुस्थानी भाषेंत) 'अल्लाची' प्रार्थना म्हणावयास सांगितलें. थोडा वेळ विचार करून 'भज गोविंदं भज गोपालम्' ही आचार्यप्रणीत चर्पटपंजरी मी घोळून घोळून म्हटली. आणि मौज ही की,

१८४