पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/136

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गामी कमल॥ मार्शल बेकर यांनी संथपणे लखोटा फोडला. त्यांतील मजकूर वाचला व कमालपाशा यांच्याकडे नजर टाकली. सर्व सभागृह निश्चल झाले; माशल बेकर यांचा चेहरा गंभीर झाला. शेवटी ते कमालपाशांना म्हणाले, मला आपल्याशी एकातांत कांहीं बोलावयाचे आहे. | माईल बेकर व कमालपाशा दुस-या दालनांत गेले. मार्शल बेकर म्हणाले, घशा, हा संदेश सुलतानांकडून आला असून, त्यांत आपणांस कैद करण्याची व परिषद बरखास्त करण्याची भला आज्ञा झाली आहे. मी आपणांस वचन दिले आहे हे खरे; पण सुलतानांची आज्ञा मला मान्य केली पाहिजे. कमालपाशा यांच्या समोर. त्यांचे भीषण भवितव्य दिसू लागले. इंग्रजांचा कैदी, माटामध्ये बंदीवास, लप्करी चवकशी आणि नंतर फांशी- ही भयानक दृष्य एका क्षणांत त्यांच्या नजरे समोरून गेल!

  • तुना गुलाम करून टाकावयाचे किंवा त्यांना स्वतंत्र करावयाचे हे सर्वस्वी आपल्या हाती आहे, कमालपाशा संथपणे व चित्तवृत्ति विचलित होऊ न देता म्हणाले.

११३