पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/144

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गझी कमालपाशा सैन्याने कुर्द लोकांची दाणादाण उडविली व गव्हर्नर अली गलीब यांना * दे माय धरणी ठाय' करावयास लावले. | या कामगिरीमुळे काँग्रेसचे प्रतिनिधी कमालपाशावर निहायत खूष झाले. कमालपाशांनी आजच्या आणीबाणीच्या प्रसंगी सशस्त्र प्रतिकार हा एकच योग्य उपाय आहे असे जे वादविवादाच्या वेळीं विधान केले होते त्याची सत्यता या बिकट प्रसंगी सर्वांना आली. शेवटी आपल्या राष्ट्रावर आक्रमण करणाच्या परकियांशी सशस्त्र प्रतिकार करणे हेच योग्य आहे असे एकमताने ठरले. त्याचप्रमाणे त्या काँग्रेसमध्ये राष्ट्रीय करार(National Pact) एक मताने मंजूर करावा असा खुद्द कमालपाशांनी ठराव आणला. तुर्की राष्ट्राचे संपूर्ण व अविभाज्य स्वातंत्र्य हे त्या कराराचे ध्येय होते. १६ राष्ट्रीय करार ही फार पुढची पायरी आहे. आतां जै सनदशीर होईल त्याचा अवलंब करणे हिताचे होईल, हळूच एक प्रतिनिधी म्हणाले.

  • भित्र्या नि निरुत्साही लोकांनी या राष्ट्रीय चळवळपासून दूर राहावे असे पहिल्याप्रथमच मी बजावले आहे, कमालपाशांचा पहाडी आवाज सगळीकडे दुमदुमला.

१२६