पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/160

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गामी कमालपाशा त्यापैकीं कांहीं सैनिकांनी चिडून जाऊन आपल्या अधिका-यांसच गोळ्या घातल्या. सुलतानांच्या रोषास बळी पडू नये ह्मणून पळून गेलेले पालमेंटचे सभासद, सैन्याधिकारी, राजकारणी भराभर अंगारा येथे जमू लागले. सर्व तुर्कस्थानांत क्रांतिच्या लाटा उसळू लागल्या. संबंध राष्ट्र आपल्या सूत्रधाराकडे, कमालपाशांकडे मोठ्या आशेने पाहू लागले. | तुर्की पालमेंटची बैठक अंगोरा येथे भरावी असे कमालपाशा यांनीं फर्मान काढले. त्या फर्मानानुसार पार्लमेंटचे सर्व सभासद अंगोरा येथे जमा झाले. त्यांनी आपल्या पार्लमेंटास १६ अँड नॅशनल असेंब्ली ' हे नवे नामाभिधान देऊन कमालपाशांना तिचे अध्यक्ष बनविलें.फ्रेंच प्रजासत्ताक राज्याच्या अध्यक्षाने एक संदेश पाठविला होता. त्या संदेशास असेंब्लीचा अध्यक्ष या नात्याने कमालयाशांनी बेडरपणे पुढलि उत्तर पाठविलें, ६ जोपर्यंत परकीयांच्या अमलाखाली आमची राजधानी आहे तोपर्यंत अंगोन्याहून अँड नॅशनल असेंब्ली तुर्की राष्ट्राचे भवितव्य ठरवीत राहील. असेंब्लीत एक कार्यकारी मंडळ निवडले असून, त्या कार्यकारी मंडळाने सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेतला आहे. सुलतान किंवा त्यांचे सरकार यांचेकडून आलेल्या आज्ञा फोल समजणेच्या आहेत. या पुढे तुर्की राष्ट्राने स्वावलंबी व स्वतंत्र राष्ट्राचे हक्क मिळविणेचा १४६