पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/169

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[1 प्रीकांचा हल्ला नव्हते.कमालपाशांच्या सैन्याजवळ दारूगोळा, वैद्यकीय पुरवठा भरपूर नव्हता; इतकेच नव्हे तर, भरपूर अन्नाची तरतूद देखील नव्हती. ग्रीकांची एक फौज उत्तरेच्या बाजूने आली व तिने जाफर यांच्या सैन्याचा पराभव केला व त्या प्रांतातून सर्व तुर्की सैन्यास हुसकून लावून आड्रीयानोपल नांवाचा महत्वाचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. दुसरी फौज स्मनच्या बाजूने सरकत येऊन, तिर्ने अली फऊद यांच्या सैन्याचा पराभव करून तेथील सर्व तुर्की सैन्यास उधळून लावले. ग्रीकांची मुख्य फौज अनातोलीयाचा रेल्वेमार्ग कबजांत घेण्याकरितां निघाली. ठिकठिकाणी ग्रीक सैन्याने तुर्कीचा पराभव केल्यामुळे, राष्ट्रांत निराशेचे दाट वातावरण पसरले. यापुढे लढण्यापेक्षां ग्रीक लोकांबरोबर तह केलेला बरा अशी भाषा सर्वत्र ऐकू येऊ लागली. राष्ट्रांत पसरलेला हा जबरदस्त निराशावाद पाहून कमालपाशांनी ताबडतोब अँड नॅशनल असेंब्लीची बैठक बोलाविली व त्या असेंब्लीत राष्ट्राच्या प्रतिनिधीं समोर त्यांच्या अंतःकरणास पीळ पडेल असे भाषण केले. ते म्हणाले, तुम्हीं पराक्रमी तुर्क आहांत. एकेकाळी या ग्रीक लोकांना खडे मारणाच्या महापुरुषांचे वंशज आहांत. काल गुलाम म्हणून तुमच्या पायांशी लोळत पडलेल्या ग्रीकांपुढे तुम्ही हार खाणार काय? त्यांना शरण जाणार काय?

  • :

- १६१