पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/173

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग्रीकांचा हल्ल अल्लाचा इषारा आहे. ज्याप्रमाणे माझी बरगडी तुटली त्याप्रमाणे तुम्हीं शत्रूची फळी ताडून काढली पाहिजे. " कमालपाशांचे शब्द ऐकल्याबरोबर तुर्क सैनिक बेभान होऊन लढू लागले. त्यांनी शत्रूवर संगनींचा हल्ला केला. १६ मारूं किंवा मरूं " या अभिनिवेशाने तुर्क लढत होते. संध्याकाळ होईपर्यंत तुर्कीनीं ग्रीक सैन्यास फुरसत घेऊ दिली नाही. शेवटीं थकून । ग्रीक सैन्य मागे हटलं. तुर्की सैनिकांनी ताबडतोब खंदक खणून त्यांच्या समोर आपला तळ दिला. ग्रीक सैन्याने अनातोलियाच्या रेल्वेचा कांहीं भाग आपल्या ताब्यात घेतला; पण जनरल इस्मतपशी यांनी ग्रीक सैन्यावर हल्ला करून त्या सैन्याला आपल्या जागी परतविले. कमालपाशांच्या सैन्याचा हा पहिला विजय होय. इकडे कझीम कारा बेकार यांनी आर्मेनियावर चढाई केली. त्यांना रशियन सैन्याचे सहाय्य मिळाले. शिवाय आपण होऊन रशियाने पैसा व हत्यारे यांची तुर्कोस मदत केली. । सुदैवाने इकडे ग्रीसमध्ये राजकीय भांडणे जोरात सुरू झाली. त्याची प्रतिक्रिया सैन्यावरही होऊ लागली. व्हेनिझिलॉस व त्यांचे सहकारी यांची अथेन्समधून हकालपट्टी केल्याचे वृत्त समजतांच सैन्यामध्ये एकच खळबळ उडाली. कारण व्हेनिझिलॉसच्या १५५