पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/184

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाजी हमालयाशा द्यावयाचे नाही असा कमाकपाशांनी पहारेक-यांना सक्त हुकूम दिला. मध्यरात्रीं कुणालाही चाहूल लागू न देतां कमालपाशा आपल्या स्टाफसह रणांगणाकडे निघाले. ठरल्याप्रमाणे २६ तारखेला पहाटे ४ वाजतां तुर्की सैन्याने ग्रीक सैन्यावर एकदम हल्ला चढविला. आपल्यावर हल्ला होणार याची ग्रीक लष्करी अधिका-यांना कल्पना देखील नव्हती. आज कमालपाशांची बडा मेजवानी असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाहीं या विचारानें ग्रीक अधिकारी स्वस्थ झोंपी गेले होते. अकस्मात हल्ला झाल्यामुळे ग्रीक सैन्य गोंधळून गेले. संध्याकाळपर्यंत तुकाना ग्रीकांचा धुव्वा उडविला. ग्रीक सैन्य सैरावैरा धावू लागले व सैन्याधिकारी आपला जीव वाचविण्याच्या प्रयत्नास लागले. तारांची कुंपणे, बंदुकी, तोफा, दारूगोळा, कपडे, तंबू सर्व टाकून देऊन ग्रीक सैन्य वाट फुटेल तिकडे पळून जाऊ लागले. तुका घोडेस्वारांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. जाता जातां ग्रीक सैनिकांनी निर्दयपणे तुर्की म्हाता-याकोतान्यांची, लहान लहान मुलांची व स्त्रियांची कत्तल करण्यास सुरवात केली. पाठलाग करणाच्या तुर्की घोडेस्वारांनीही त्या ग्रीक सैनिकांस कंठस्नान घालून पुरेपूर सूड उगविला. ग्रीक सैनिकांनी दहा दिवसाच्या आंत १९० मैल मागे पळत जाऊन समुद्र गांठला व त्या ठिकाणी नांगरलेल्या आपल्या बोटींत बसून ते पसार झाले. समुद्राच्या ३७