पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/196

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा आपल्या राष्ट्राचे जे ध्येय ठरवू त्यावर विकाराची किंवा मनोराज्याची पडछाया पडता कामा नये. अशा निष्फळ मनोराज्यापासून आपण दूर रहा. अशा मनोराज्यापायीं आपणांस आतापर्यंत जबर किंमत द्यावी लागली आहे." बोल्शेविक लोकांनाही त्यांनी असेंच उत्तर दिले. मास्कोहून जनरल फ्छन्झ यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कमालपाशांकडे आले होते. मेजवानीच्या प्रसंगी त्या शिष्टमंडळाच्या नेत्याने कमालपाशांना विनंती केली, ८८ व्या राष्ट्रांवर व नागारकांवर जुलूम होत आहे, त्या जुलूमापासून त्यांना मुक्त करण्याचे ध्येय बोल्शेविक रशियाने पत्करले आहे. तरी या पुण्यकायत तुर्कस्थानाने सहभागी व्हावे कमालपाशानी उत्तर दिले, 4 जुलमी किंवा जुलमानें गांजलेले असे कोणी या जगांत नाहीत. पण आपल्यावर जुलूम करण्यास परवानगी देणारे लोक मात्र आहेत. या शेवटच्या कोटीमधील तुर्क लोक नाहींत. आपली काळजी कशी । व्यावी हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे. बाकीच्यानींहि आपआपली काळजी घ्यावी म्हणजे जुलूम करणाराचा व करून घेणारांचा प्रश्नच उरणार नाहीं. त्याचप्रमाणे तुर्कस्थानाने पाश्चात्य राष्ट्रांविरुद्ध पौर्वात्य राष्ट्रांचे पुढारीपण पत्करावे किंवा इस्लामी राष्ट्रांचे नेतृत्व स्वकारून १७८