पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/200

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा के कांही दिवसांनी लासेन येथे तहाची भाषा करण्याकरितां एक शिष्टमंडळ पाठविण्याचे आमंत्रण, दोस्तराष्ट्रांनी सुलतानांना दिले व तेच आमंत्रण नॅशनल अँड असेंब्लीला पोहचविण्यास सुलतानांस फर्माविले. सदर आमंत्रण पत्करल्याबद्दल तुर्कजनता सुलतानांवर खळबळून गेली. दोस्तराष्ट्रांबरोबर संगनमत करून करून सुलतानानीं राष्ट्राचा घात करण्याचे योजिले आहे असा गवगवा सगळीकडे झाला. सुलतानांचा पाठपुरावा करणारे जे लाक होते त्यांना बदडून काढण्याचा उपक्रम तरुण तुकानी सुरू केला. सुलतानांनी आमंत्रण स्विकारले तेच बरोबर केले असा आक्रोश करणाच्या अली कमाल नांवाच्या पत्रपंडिताला दिवसाढवळ्या दगडांनी ठेचून ठार मारण्यांत आले. सुलतानांच्या नोकरांना, मंत्र्यांना किंवा सेक्रेटरींना बाहेर उजळ माथ्याने हिंडण्याची चोरी होऊन बसली. अंगोरामध्ये असेंब्लीची बैठक सुरू झाली. असेंब्लीच्या सभासदांचेही पित्त खवळले होते. प्रत्येक सभासदाच्या तोंडून निषेधाचे उद्गार बाहेर पडू लागले. ' कॉन्स्टेटिनोपलमध्ये असणारे नामधारी सरकार किती किंमतीचे आहे हे आम्ही पूर्णपणे ओळखतो ! तुर्कस्थानाला वाचविण्याकरितां तुर्कस्थानाचे १११