पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/206

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा - करतां एकादी गोष्ट ताबडतोब अमलात आणण्याचा मुर्खपणा त्यांनी कधीही केला नाही किंवा लष्कर आपल्या ताब्यात आहे म्हणून लष्करी जोरावर आपल्या कल्पना लोकांवर लादण्याचा आतताईपणाही त्यांनी केला नाही. जनतेची, राष्ट्राची नाडी धरूनच कुठलेही कार्य करून टाकावयाचा त्यांचा बाणा होता. ध्येयपूर्तीकरितां जनतेच्या साहाय्याची त्यांना अत्यंत अपेक्षा होती. जनतेची मनोभूमिका तयार करण्याकरितां त्यांनी १६ पीपर पार्टी' या नावाचा एक राजकीय पक्ष तयार केला. या पक्षाचे धुरीणत्व कमालपाशांनी स्वतः स्वीकारले. सर्व राष्ट्रभर या पक्षाचा फार जोराचा फैलाव झाला. शहरोशहरी, खेडोपाडी त्याच्या संस्था पसरल्या. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये कमालपाशांनीं दौरा काढा व आपल्या राजकीय पक्षाची समक्ष तपासणी के, ते ज्या ज्या ठिकाणी जात, त्या त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या लोकांस बोलावून आणीत व सांगत, ६६ आपली मजबूत संघटना करा. आपल्ला शत्रू जरी निघून गेला तरी अद्याप आपल्या राष्ट्राचे अंतस्थ शत्रू फार आहेत. त्या शत्रूचा निःपात करून आपलें राष्ट्र सुखा करावयाचे आहे. प्रत्येक नव्या दमाच्या तरुण तुर्काला तुमच्या पक्षांत सामील करून घ्या. तुम्ही आपल्या राष्ट्राचे नेते आहांत ही गोष्ट विसरू नका.” है ३८८