पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/207

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लॉसेन परिषद् २ मात्र कमालपाशांनी आपण क्रांतिकारक योजना पार पाडणार आहोत याचे दिग्दर्शन चुकून देखील केले नाही. लो। अजाण व पुराण्या विचाराचे असल्यामुळे अशा कल्पनामुळे ते । बिथरून जातील म्हणून त्यांचा उल्लेख करण्याचे कमालपाशांनीं । शहाणपणाने टाळले. सर्व अनुयायांनीं कमालपाशाशी इमानी राहण्याच्या शपथा घेतश्या. शेवटीं दौरा संपत्यानंतर ते अंगोरास परत गेले. लॉसेन येथे बोलाविलेल्या शांतता परिषदेत भाग घेण्याकरितां दोस्त राष्ट्रांनी अँड नॅशनल असेंब्लीला स्वतंत्रपणे आमंत्रण दिल्यामुळे कमालपाशानी ते आमंत्रण स्वीकारले व त्या परिषदेत तुर्कस्थानतर्फे भाग घेण्याकरितां त्यांनी जनरल इस्मताशा यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ नेमले. नोव्हेंबर महिन्यांत शांतता परिषद सुरू झाली. परिषदेच्या सुरवातीस दोस्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी तुर्की शिष्टमंडळाचा खटका उडाला. परिषदेच्या हॉलमध्ये तुझ शिष्टमंडळासह इस्मतपाशा । प्रवेश करताच त्यांच्या स्वागतासाठी कोणीच पुढे आले नाहीं. मुसोलिनी, पाईंकारे व लॉर्ड कर्झन हे बडे मुत्सद्दी हॉलमध्ये बसले होते; पण त्यापैकी एकानेहीं शिष्टाचाराची वागणूक दाखविली नाहीं. इस्मताशांनीं समवार पाहिले तों तुर्की शिष्टमंडळाला १८६