पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/264

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शादी वा यानंतर लवकरच असेंब्लीमध्ये १८ कमालपाशांनीं तुर्की प्रजासत्ताक राज्याचे तहहयात अध्यक्ष राहावे " असा अभूतपूर्व ठराव पास करून, अखिल तुर्क राष्ट्राने कमालपाशांविषयी वाटणारी आपली कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त केली. हयात असेपर्यंत प्रजासत्ताक राज्याचे अध्यक्ष होण्याचा मान जगामध्ये कमालपाशांनी पहिल्या प्रथम मिळावे, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. कमालपाशांच्या यशस्वी कारकिर्दीमधील अत्यंत महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी एकेकाळीं कट्टर दुष्मन असणाच्या राष्ट्रांशी केलेले अनाक्रमणाचे व स्नेहयाचे तह होय. महायुद्धांत तुर्कस्थानाचा लचका तोडण्यास तयार झालेल्या राशयांशी कमालपाशांनी सन १९२६ सालीं तटस्थतेचा व अनाक्रमणाचा तह केला. अशाच तहेचा तह फ्रान्सशी सन १९२९ साली करण्यांत आला. . सर्वांत महत्वाचा तह म्हणजे तुर्कस्थानाला नेस्तनाबूद करू पाहणा-या ग्रीक राष्ट्राबरोबर सन १९३२ साली झालेला तह होय. ग्रीक व तुर्क यांचे अतिकुलवत सख्य होते हैं आपण मागे पाहिच आहे. ग्रीकांनी तुकवर अनातोलियामध्ये केल्या भयंकर अत्याचाराची अंद्याप विस्मृती पडली नव्हती. त्यांना तुकच्या अंतःकरणावर केलेली जखम अद्याप भरून निघाली | .:-..


-

.... |६४६