पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/4

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

The Muslim Marathi Literary Series मुस्लिम मराठी साहित्य. --- विज्ञप्ति मानवी जीवनांतील क्षुद्रता, अपुरेपणा व असंतोष यांचे निराकरण करून ते उन्नत व सुखी करण्याचे महत्कार्य साहित्याकडून होत असते. या साहित्यद्वारा हिंदुस्थानांतील सर्वधर्मीय नागरिकांत उच्च विचारसरणी, व्यापक दृष्टि व समाधान निर्माण करणे हे आपल्या राष्ट्रापुढील एक अत्यंत महत्वाचे कार्य आहे. एक हजार वर्षे एकत्र राहूनसुध्दां परस्परांची अंतःकरणे व्हावी तशी एकजीव न होण्यास, परस्परांचा इतिहास, संस्कृति, तत्वज्ञान इत्यादि बद्दल यथायोग्य ज्ञानाचा अभाव हे एक कारण आहे. इस्लामचे खरेखुरे स्वरूप, त्याचे तत्वज्ञान, इतिहास, संस्कृति व मुस्लिम विभूतींची चरित्रे इत्यादबद्दल यथायोग्य कल्पना आल्यास आज घडत असलेल्या अप्रीय गोष्टीस आळा बसून प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होण्यास अनुकूल वातावरण उत्पन्न होईल. मराठी साहित्यद्वारांअशा त-हेचे वातावरण निर्माण करण्याचा यथाशक्ति प्रयत्न करावा व महाराष्ट्राच्या मायबोलीचीमराठीची काहीतरी सेवा घडावी, या सहेतूने * मुस्लिम मराठी साहित्य, सुरू करण्याचे मी धाडस केले आहे. ' मुस्लिम मराठी साहित्या' मधून ललित व वास्तववादी वाङ्मयास अवश्य प्रासिध्दी देण्यात येईल; मात्र ते वाङ्मय जातीय ऐक्यास प्रेरक व पोषक मात्र हवे. अशा ध्यययुक्त व