पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/53

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुरुंगांतून सुटका जुवेदा खानम यांची स्थिती वेड्यासारखी झाली. आपल्या मुलाचे काय झाले असेल? तो जिवंत असेल कां ? त्याचा गुप्तपणे वध तर झाला नसेल ? त्याला विषाचा प्याला तर दिला नसेल ? त्याच्या छातींत कट्यार तर खुपसली नसेल ? त्याला समुद्रांत फेकून तर दिला नसेल ? असे अनेक अमंगल विचार जुबेदा खानम यांच्या अंतःकरणाचा ठाव घेऊ लागले.कारण सुलतानविरुद्ध कट करणा-यांचा शेवट अशाच रीतीने होत असे; न्यायासनासमोर आणण्या पूर्वीच अशा शेकडो देशभक्तांचे खून गुप्तपणे पाडण्यात येत असत; आणि ही अबोर कृयें सुलतानाच्या पूर्ण संमतीने केली जात, दोनचार आठवडे गेले. जुबेदा खानम यांच्या डोळ्यांतला अश्रूप्रवाह सारखा सुरू होता. त्यांच्या दृष्टीला अंधत्व येऊ लागले; चेह-यावर शेतकळा पसरली. कमाल यांची चवकशी सुरू झाली. त्यांच्यावरील आरोप अत्यंत भयंकर होता आणि पोलिसाजवळ त्याबद्दल भरपूर पुरावाही पण होता. चवकशी पूर्ण झाली आणि केमाल यांना सर्व कैद्यापासूनअलग करण्यांत येऊन एको अधार कोठडीत टाकण्यात आले.पण तेवढ्या वरच निभावले हे कमाल यांचे नशीबच समजले पाहिजे ! कारण अशा राजद्रोह्याच्या भयंकर गुन्ह्याबद्दल त्यांचा शुरुगांतल्या तुरुगांतच मृत्यु आला असता ! असे कित्येक राजकीय गुन्हेगार एकदां तुरुंगांत