पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/57

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। प्रकरण ५ वें ---xx--- पुन्हा अटकेचा हुकूम ! -- • ८० दिवसांच्या खडतर प्रवासानंतर कमाल बैरूत येथे पाहचले व तेथून घोड्यावरून मजल दर मजल करीत ते दमास्कस येथील लष्करांत दाखल झाले. त्यावेळी ते लष्कर, नुक्तेच बंड करणाच्या डूस नांवाच्या रानटी डोळ्यांचा बंदोबस्त करण्याकरितां, निघावयास सज्ज झाले होते. तो प्रदेश डोंगराळ असल्यामुळे त्याठिकाणी चांगले रस्ते नव्हते किंवा लष्करास उतरावयास ऐसपैस जागा नव्हती. प्यावयाचे पाणी मोठ्या मुष्कीलीने मिळत असल्यामुळे डूसलोकांच्या पारिपत्याकरितां निघालेल्या तुर्की लष्कराचे आतिशय हाल झाले. लष्करी जीवनामध्ये किती त्रास व हाल अमतात याची कल्पना कमाल यांना प्रथमच झाली. तुर्की सैन्याने डूस बंडखोरांना पकडण्याची खूप खटपट केली; पण त्यात यश आले नाहीं डूस बंडखोर तुर्की सैन्याच्या समोरासमोर न येतां गनीमी काव्याने लढत. तुर्की सैन्य चालून आले म्हणजे ते डोंगरकपारींतून लपत असत. शेवटी कंटाळून तुक