पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/66

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझी कमालपाक्षा एक दिवस कमाल आपल्या कांहीं क्रांतिकारक स्नेह्यांना बोलावून, त्यांच्याशी वाटाघाट करीत होते. घरांतील नोकर लोकांनी त्यांचे चाललेले ज्वलजहाल संभाषण ऐकून, त्याची वर्दी जुबेदा खानम यांना दिली. जुबेदा स्वतः त्या खोलीजवळ आल्या व दाराशीं कान देऊन त्यांनी सर्व संभाषण ऐकले. स्नेहीमंडळी गेल्यावर कमाल यांनी सर्व कागदपत्र गोळा केले व एका पेटीत बंदोबस्ताने ठेवून दिले. हातांतील सिगारेट विझवून ते बिछान्यावर लवंडले. इतक्यांत दरवाजा उघडल्याचा आवाज आला. कमाल उठून पाहतांत तो त्यांची आई समोर उभी. त्यांनी आईच्या चिंताक्रांत चेह-याकडे न्याहाळून पाहिले. आपल्या आईला सर्व प्रकार माहीत झाला असला पाहिजे हे कमाल यांनी चटकन् ताडले.

  • बेटा, मला एक गोष्ट तुझ्याकडून कळली पाहिजे. तू सुलतानाविरुद्ध बंड करणार आहेस हे खरं कां ? "
  • होय, आई !” ।

44 पण या भयंकर गोष्टीचा तू पूर्ण विचार केला आहेस कां ? सुलतान म्हणजे कोणी लहानसहान व्यक्ति नाही. त्यांच्या अंगांत सात संतांचे सामर्थ्य एकवटलें आहे."