हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११ )
**

 उत्तम गाणे म्हणजे चारुदत्ताला मेजवानी. त्या रात्री रेभिलच्या गाण्यांत तो इतका गुंगून गेला कीं रात्र फार झाली आहे याचे त्याला भानहि उरलेंं नाहीं. तो जागरणाने अगदी थकला होता. तरी घरी येऊन अंथरुणावर अंग टाकण्यापूर्वी त्याने आपला मित्र मैत्रेय याच्यापाशीं एका गोष्टीची काळजीपूर्वक चौकशी केलीच. “ वसन्तसेनेचे दागिने नीट सुरक्षित ठेवले आहेस ना?"

 “ त्याची काळजी नको; उशाला घेऊनच निजतोंं म्हणजे चोरीची भीतीच नको.” मैत्रेयाने बेफिकीरपणाने त्यावर उत्तर दिले.

 लवकरच दोघेहि गाढ झोंपी गेले. परंतु नगरांतले चोर मात्र आतां जागे झाले होते. शर्वीलक हा वास्तविक वेदपारंगत ब्राह्मणाचा मुलगा; परंतु चोरी-जुगारीच्या नादाला लागला होता. चोरीच्या कामांत त्याचा मोठा हातखंडा. त्याचे प्रेम बसले होते मदनिका नांवाच्या एका दासीवर. मदनिका ही वसन्तसेनेची दासी. दासी पण आपल्या मालकिणीप्रमाणेच मनानेंं मोठी होती. तिचेंंहि हृदय शर्वीलकाच्या प्रेमपाशांत गुंतले होते. परंतु ती पडली दासीगुलाम. पुरेसे पैसे भरून तिची कोणी सुटका करणार तेव्हां ती स्वतंत्र होणार आणि मग लग्न करणार. त्यासाठी शर्वीलक पैशाच्या फिकीरीत होता. त्यानेंं ठरविलें कींं,