या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३२

कॉक उघडून सर्व पेठ्यांत थंड पाणी भरावें. पेव्या थंड पाण्यानें

भरल्यानंतर त्या नळीचें काक बंद करावे. या योगें गरम साचे व त्यां- तील गरम द्रव्य थंड होतें. नंतर १५-२० मिनिटें थांबावें ह्मणजे साचांतील पातळ द्रव्य त्याच्या ( आतां मेणबत्यांच्या ) मध्य भागापर्यंत (वातीपर्यंत ) घट्ट होतें.

२ ओझोकिरीट द्रव्याचें ओतकाम करणें-वर सांगितलेल्या प्यारा-

फीन मेणाच्या ओतकामाप्रमाणेच याचेंही ओतकाम करावें. ३ स्टिअरीन. ( स्टिअरीक आसीड ) च्या मेणबत्यांचें ओतकाम करणें —— मागें सांगितल्याप्रमाणे साचांत वाती ठेवाव्या. नंतर ते साचे अ पेट्यांत थंड पाणी व वाफ सोडून गरम करावे. ओतावयाचें स्टिअरीन त्याचे पातळ होण्याचें उष्णमान किती आहे तें पहावें. स्टिअरीनच्या गठथावरील चिठ्ठीवरून ते सहज समजतें. स्टिअरीनच्या पातळ होण्याच्या उष्णमानापेक्षां, साचांचें उष्णमान १०° फा. अंश कमी ठेवावें. मोठया प्रमाणावर बनविलेल्या स्टिअरीनचें पातळ हो- ण्याचे उष्णमान बहुधा १२८ - १४२° फा. अंश असतें. सबब या प्रमाणानें १०° फा. अंश कमी ह्मणजे सुमारें ११८-१३२° फा. अंशापर्यंत साचे गरम करावे. याप्रमाणे पाणी गरम झाले झणजे साचे "गरम होतात. नंतर वाफ सोडणे बंद करावें. पान २२४-२५ वर लिहि लेल्या नंबर ८, ९, १०, ११ व १२ पैकी कोणतेही एक नंबरचें द्रव्य कोरडें व पातळ करून कोरड्या कढईत ठेवलें असतें. त्यांतून एका लहान भांड्यांत घेऊन ते थिजण्याच्या म्हणजे घट्ट होण्याच्या बेतांत ( या वेळेस जरी ते थिजण्याच्या बेतांत आले असते तरी पण त्यांत गोळे किंवा गुठळ्या नसाव्या. ) आर्ले म्हणजे साचावरील उघड्या पेटींत हलकेच ओतून द्यावें. सर्व साचे भरून त्यावरील उघड्या पेटींत तें द्रव्य २-२॥ इंच उंच राहील इतके पातळ द्रव्य