या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४२

कळीदार मेणबत्त्या ओतण्याच्या खोलींतच मोठाल्या पुडक्यांत त्या बंद करतात. नंतर तेथून तीं पुडकीं पेट्यांत भरण्यास्तव प्याकींगच्या खोलीत पाठवितात. फक्त देशांतल्या देशांत खपणाऱ्या मेणबत्त्यांचीं वर सांगित- ल्याप्रमाणे मोठालीं पुडकीं ( दरेक ३-६ शेर वजनाचें ) बांधण्याचा रिवाज आहे. पण ज्या मेणबत्या परदेशांत विक्रीसाठी पाठवावयाच्या असतात, त्या खाली लिहिल्याप्रमाणें प्याक करतात.

परदेशी पाठविण्याच्या मेणबत्या प्याक करणें - या पुडक्यां

तही आंतून पांढरा व बाहेरून निळा कागद ठेवण्याचा रिवाज आहे, दरेक पुडक्यांत सहा मेणबत्त्या व दरेक पेटींत २५०३० पुडकीं ठेव- ण्याचा रिवाज आहे. नंतर दरेक पुडक्यावर छापील चिड़ी व दरेक पेटीवर मोठालीं काळीं अक्षरें उठवलेली असतात. त्यांतील मजकूरही वर लिहिल्याप्रमाणेंच असतो.

सहा मेणबत्त्यांचें एक अशी शंभर पुडकीं एक मनुष्य एक तासांत

तयार (प्याक ) करूं शकतो. दर तासांत ६०० मेणबत्त्या किंवा सरासरी ७४ शेर द्रव्य झणजे ९ तासांच्या एक दिवसांत ६७५ शेर द्रव्य प्याक केलें जातें.

याप्रमाणे मेणबत्त्या प्रथम कागदाच्या पुडक्यांत व नंतर ती पुडक

देवदारी पेढ्यांत बंद करून वखारींत पाठवितात.

काम ८ वें. मेणबत्यांच्या जाती - मेणबत्त्यांच्या जाती दोन प्र*

कारांनी ठरवितात.

१ ला प्रकार — ज्या मूळ द्रव्याच्या मेणबत्त्या वनवितात त्यावरून

त्या मेणबत्त्यांस नांवे देतात, जसें १ स्टिअरीनच्या ह्मणजे स्टिअकि