पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२२

अरिक आसिडांत दर शेकडा स्वच्छ केलेलें मधमाशाचें मेण किंवा प्याराफीन २-१० भाग मिळवून त्याचे मोठाले गठ्ठे पाडण्यास तें तशा साचांत ओतावें, तें कठीण झाल्यावर गड्ढे काढून कोठारांत ठेवावे, यास. च व्यापारी लोक स्टिअरीन ( स्टिअरीक आसीड ) ह्मणतात व त्याच्या मेणबत्या करितात, या पहिल्या प्रकाराने हल्लीं फारच थोडे लोक हैं काम करतात.-

दुसरा प्रकार -- पहिल्या रीतीच्या दुसऱ्या प्रकारानें काम करण्याची

माहिती या रीतीच्या पहिल्या प्रकाराने तयार केलेले स्टिअरीक आसीड कठीण असतें तरी पण त्याचा रंग अगदर्दी पांढरा स्वच्छ नसतो. याचें कारण त्या प्रकारांत चुना फार वापरल्यामुळे तो बाहेर काढून टाक- ण्यास जास्त सलफ्युरीक आसीड वापरावें लागतें. त्याच्या योगानें, तयार झालेल्या स्टिअरीक आसिडाचा रंग कमी पांढरा होतो व खर्च जास्त येतो. नवीन शोधांतीं असें समजले आहे कीं बंद भांड्यांत स्निग्ध पदार्थ ठेवून त्याच्या दर चौरस इंचावर ४२-५६ पौंड वजनाचा दाब देऊन जर चुन्याबरोबर तो पदार्थ शिजविला तर पूर्ण साबणक्रिया हो- ण्यास त्याच्या दर १०० भागास चुना ३-४ भाग (शेकडा १६ भागांच्या ऐवजीं) पुरे होतो. आणि तो चुना बाहेर काढण्यास, सलफ्युरिक आसि- डही पहिल्या प्रकारापेक्षा कमी वापरावें लागतें, त्यामुळे दुसऱ्या प्रका रार्ने तयार होणाऱ्या स्टिअरीक आसिडाचा रंग पहिल्या प्रकारानें तयार होणाऱ्या स्टिअरीक आसिडाच्या रंगापेक्षा अधिक पांढरा असतो. व खर्च कमी येतो. सबब या रीतीच्या दुसऱ्या प्रकाराचाच उपयोग हल्लीं अमेरिकेत या कामी विशेष करितात.

या दुसऱ्या प्रकारानें काम करण्यास हौद भांडीं वगैरे सामान पहि-

त्या प्रकारांतील सामानाप्रमाणे असतें. पण आकृती नं. ३ मधील ब